आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वी आणि 12 वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर, मंडळाच्या संकेतस्थळावर पाहू शकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उछ्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागामार्फत घेण्यात येणाऱअया उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र(इ. 10वी) लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाकडून जाहीर.




महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळावर दिनांक 15/10/2019 पासून उपलब्ध करून देण्यात आले होते. या वेळापत्रकाबाबत काही सुचना असल्यास मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन करुन 12 वी आणि 10 वीचे संभाव्य वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार परीक्षा होतील. विद्यार्थी आणि पालक परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्यी अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.maharashtra.gov.in यावर जाऊन पाहू शकता.

बातम्या आणखी आहेत...