business special / अर्थ मंत्रालयाने सरकारसाठी तयार केला 100 दिवसांचा अजेंडा, अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

बँकिंग क्षेत्रातील कॉर्पोरेट गव्हर्नेसचे पातळी सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाईल

दिव्य मराठी वेब टीम

May 23,2019 04:30:00 PM IST

नवी दिल्ली- अर्थ मंत्रालयाने नव्या सरकारसाठी 100 दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 2018-19 च्या तिसऱ्या त्रैमासिकात जीडीपी ग्रोथ 6.6 टक्क्यांनी घसरला होता. न्यूज एजंसीच्या माहितीनुसार, वैयक्तिक गुंतवणूक, रोजगार वाढवणे आणि शेती क्षेत्राला मदत करण्याचा शासणाचा अजेंडा असेल. यासोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन वाढवण्यासाठी आणि टॅक्स प्रक्रिया सोपी करण्यावर शासन लक्ष केंद्रित राहणार आहे. जुलैमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आयकर स्लॅब आणि आयकर दरातील बदलांचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच मोदी सरकारच्या अंतिम अर्थसंकल्पात याचे संकेत देण्यात आले होते.

न्यूज एजंसीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रिअल ग्रोथ, क्रेडिट ग्रोथ आणि बँकिंग क्षेत्रात स्थिरता 100 दिवसांच्या एजेंड्यामध्ये समावेश होतो. तसेच बँकिंग क्षेत्रातील कॉर्पोरेट गव्हर्नेसचे पातळी सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करणे.

X
COMMENT