National / सुरतमधील इमारतीत भीषण आग, जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या, 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू

इमारतीत अनेक लोक अडकल्याचे सुत्रांकडून कळाले आहे

दिव्य मराठी वेब टीम

May 24,2019 06:17:22 PM IST

सूरत(गुजरात)- गुजरातच्या सुरतमधील तक्षशिला कॉम्पलेक्समध्ये भीषण आग लागल्याने 13 विद्यार्थांचा मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या इमारतीमध्ये कोचिंग सेंटर आहे. आग लागल्यानंतर त्यापासून जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना चौथ्या मजल्यावरून खाली उड्या माराव्या लागल्यात. या अपघातात मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.


सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पण इमारतीमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले, "सुरतमध्ये भीषण आग लागल्याच्या घटनेने खूप दुखीः आहे. माझ्या भावना मृतांच्या कुटंबासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो. मी गुजरातच्या स्थानिक प्रशासनाला हवी ती मदज पुरवण्याचे आदेश दिले आहेत. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्नशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत."

X
COMMENT