आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांगुलीचा कार्यकाळ वाढविण्यासाठी लोढा समितीच्या शिफारशींमध्ये बदल करण्यास मंजूरी, सुप्रीम कोर्टात पाठवणार प्रस्ताव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीसीसीआय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) सौरव गांगुली (मध्यभागी) - Divya Marathi
बीसीसीआय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) सौरव गांगुली (मध्यभागी)

स्पोर्ट डेस्क - बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) रविवारी मुंबईत पार पडली. यामध्ये लोढा समितीच्या शिफारशींमध्ये बदलांना मान्यता देण्यात आली आहे.  उच्च पदावरील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढू शकतो. सौरव गांगुलीची ऑक्टोबर महिन्यात अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आणि त्यांचा 9 महिन्यांचा कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपणार आहे. प्रस्तवास मंजुरी दिल्यानंतर गांगुलीचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवता येऊ शकतो. 

एक अधिकारी सहा वर्षांपर्यंत पदावर राहू शकतो

सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या घटनेनुसार, जर एखादा अधिकारी बीसीसीआय किंवा स्टेट युनियनमध्ये तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यास त्याला तीन वर्षाचा अनिवार्य ब्रेक (कूलिंग ऑफ पीरियड) घ्यावा लागेल. गांगुली 5 वर्षे 3 महिने बंगाल क्रिकेट बोर्डाचे (सीएबी) अध्यक्ष राहिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानुसार त्याच्याकडे 9 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. 

 

कुलिंग ऑफ पीरियड संपू शकतो


या बैठकीत लोढा कमिटीच्या शिफारशींमध्ये सुधारणा करून कुलिंग ऑफ पीरियड संपवण्याबाबत चर्चा झाली. हा कुलिंग ऑफ पीरियड बोर्ड व राज्य संघटनेच्या वेगवेगळे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यावर व्हावा अशी अधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र कूलिंग ऑफ पीरियडवर काय निर्णय घेण्यात आला… हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.