आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/बंगळुरू : कर्नाटकात बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उल्लारथी गावात भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण केंद्राचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. यात अंतराळवीरासाठी प्रशिक्षणाची सोय असेल. या केंद्रात त्या सर्व सुविधा असतील ज्यासाठी अंतराळ प्रवासासाठी निवडण्यात आलेल्यांना रशियातील रॉसकॉसमोस पाठवले जाते. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, गगनयानासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी कोट्यवधी खर्चून पाठवावे लागत आहेत. भविष्यात त्या सुविधा आपल्याकडे असतील. मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाशी संबंधित इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांत सुरू असलेले उपक्रम व सुविधा उपलब्ध केल्या जातील. अंतराळ यानाचे क्रू व सर्व्हिस मॉड्यूलपर्यंत अंतराळवीरांचे प्रशिक्षण व मोहीम नियंत्रण केंद्रही असेल. गगनयान आमचा एकच मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम नसेल तर भविष्यात अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याचा कार्यक्रम सुरू राहील. सध्या गगनयानला अंतराळात घेऊन जाणाऱ्या जीएसएलव्ही मार्क- ३ रॉकेटवर तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात, गगनयानच्या क्रू व सर्व्हिस मॉड्यूलवर बंगळुरूतील यू. आर. राव सॅटेलाइट संेटरमध्ये व अंतराळवीरांची निवड व प्राथमिक प्रशिक्षणाचे काम एअरफोर्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसनमध्ये सुरू आहे. या ठिकाणी एकाच वेळी तीन अंतराळवीरांना प्रशिक्षण देता येईल. नासात एकाचवेळी १३ अंतराळवीरांना प्रशिक्षणाची सुविधा आहेे.
किती मोठे असेल केंद्र
४७३ - एकर जमिनीवर तयार होईल अंतराळ उड्डाण केंद्र. ते तयार झाल्यानंतर अापल्या अंतराळवीरांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची गरज नसेल.
हवेत तरंगत काम, खानपान-प्रातर्विधीचे प्रशिक्षण
एका अंतराळवीरावर ३० कोटींची बचत
सध्या गगनयानसाठी निवडलेल्या अंतराळवीरांना रशियातील रॉसकॉसमोस येथे प्रशिक्षणाला पाठवले जात आहे. यावरील खर्चाची इस्राेने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, जाणकारांच्या माहितीनुार एक अंतराळवीराचे प्रशिक्षण विदेशात करण्यावर २५-३० कोटी रुपये खर्च येतो. केंद्र झाल्यावर हे काम देशातच होऊ शकेल.
असे करणारा भारत सहावा देश असेल
आतापर्यंत नासा (अमेरिका), ईएयू, रॉसकॉसमोस (रशिया), जर्मनी, सुकुबा अंतराळ केंद्र (जपान) आणि चायनीज नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (चीन) येथे अंतराळवीरांना प्रशिक्षित करणे व अंतराळात पाठवण्याची सुविधा अाहे. प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण कालावधी तीन ते साडेतीन वर्षे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.