दुष्काळस्थिती / देशातील पहिले कॅशलेस गाव आता बनले ‘वाॅटर लेस’; सध्या गावात आठवड्यातून एकदाच येते टँकर

कॅशलेस गाव म्हणून धसईचा देशात मोठा गाजावाजा झाला. मात्र, सध्या गावात आठवड्यातून एकदाच टँकर

प्रतिनिधी

May 08,2019 10:16:00 AM IST

हे चित्र आहे देशातील पहिले कॅशलेस गाव धसई (जि.ठाणे). सध्या हे गाव दुष्काळाचे भीषण चटके साेसत आहे. गावात असलेल्या विहिरीनेही तळ गाठला आहे. एक जण जीव मुठीत धरून विहिरीत उतरून पाणी भरतानाचे मंगळवारी टिपलेले हे छायाचित्र. पहिले कॅशलेस गाव म्हणून धसईचा देशात मोठा गाजावाजा झाला. मात्र, सध्या गावात आठवड्यातून एकदाच टँकर येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच विहिरीत उतरून पाणी भरताना अनेकांना दुखापतही झाली. सरकारने गावातील पाणीटंचाईकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

X
COMMENT