• Home
  • National
  • The first Chief of Defense staff would have met before the China war, but Nehru withdrew from his defense minister

Chief of Defense / पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चीन युद्धाआधी मिळाला असता, मात्र नेहरू आपल्या संरक्षणमंत्र्यांच्या विराेधामुुळे मागे हटले

पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेने लष्कराला संयुक्त प्रमुख मिळेल,  5 W , 1 H  द्वारे समजून घ्या सरकारची नवी घोषणा
 

दिव्य मराठी

Aug 18,2019 10:46:00 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सैन्य दलासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस)च्या पदाची घोषणा केली आहे. सीडीएस थल सेना, हवाई दल आणि नौदल तिन्हींना प्रभावी नेतृत्व प्रदान करेल आणि त्यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी काम करेल. तज्ज्ञ व माजी सैनिक दीर्घकाळापासून याची मागणी करत होते. सीडीएस बनवण्याचा प्रस्ताव १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर कारगिल आढावा समिती(केआरसी)ने २० वर्षांपूर्वी,२००० मध्ये दिला होता.


भारतात सध्या सीडीएसचा एक खूप कमकुवत पर्याय काम करत आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटी(सीओएससी)चे चेअरमनच्या नेतृत्वात हे काम होते. तीन दलांच्या प्रमुखांमध्ये जो सर्वात वरिष्ठ असतो, तो हे पद सांभााळतो. त्याच्या निवृत्तीनंतर हे पद दुसऱ्याला मिळते. सध्या हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ या पदावर कार्यरत आहेत. तज्ज्ञांनुसार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीनंतर संरक्षण आराखड्याची प्राथमिकता सोपी होईल. उदा. सर्वात जास्त खर्च कशावर व्हावा. उपकरणांवर, लढाऊ विमानांवर की पाणबुडीवर. नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या कार्यकाळात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या दिशेने काम सुरू केले होते. मात्र, सीडीएसच्या नियुक्तीचा निर्णय होऊ शकला नाही. तीन वर्षांपूर्वी सरकारने संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, त्यांना या प्रकरणात सर्व पक्षांचे मतैक्य हवे आहे आणि सध्या चर्चा प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. पर्रीकर यांनी यासंदर्भात शेकटकर समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्याचे सूतोवाच केले होते. जाणून घेऊया सीडीएसबाबत.

5 W , 1 H द्वारे समजून घ्या सरकारची नवी घोषणा

WHAT कोण असतो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अशी एकमेव व्यक्ती असते जी दीर्घ अवधीची संरक्षण योजना आणि व्यवस्थापनावर सरकारचे नेतृत्वाला सल्ला देते. ते तिन्ही सेनांमध्ये समन्वय राखतात. मात्र, यासोबत मनुष्यबळ, उपकरण आणि रणनीतीबाबत कोणत्याही कारवाईत तिन्ही लष्करांची जॉइंटमनशिपही निश्चित करेल. यामुळे इंटेलिजन्स ग्रिड आणि नॅशनल सेक्युरिटीमध्ये समन्वय निश्चित केला जाईल. या पदावर बसलेली व्यक्ती तिन्ही दलाचा उपयोग निश्चित करेल.

WHEN देशात केव्हापासून या पदाची मागणी होत आहे
भारतात जवळपास २० वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता सीडीएसची नियुक्ती होत आहे. सीडीएस नियुक्तीवर एकमत नाही. केआरसीच्या अहवालानंतर हवाई दलाने याला विरोध केला होता. हवाई दल आणि नौदलाला वाटते की, त्यांच्या तुलनेत स्थल सेना खूप मोठी आहे. त्यामुळे बहुतांश प्रसंगात सीडीएस स्थल सेनेचाच होईल. पंडित नेहरू १९६२ च्या चीन युद्धाअाधी सीडीएस बनवू इच्छित होते. मात्र, तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्णा मेनन यांच्या विरोधामुळे ते यापासून मागे हटले.

WHY देशाला सीडीएसची का आवश्यकता आहे
> निवृत्त ब्रिगेडियर राजीव भुटानी यांनी आपले पुस्तक “रिफॉर्मिंग एंड रिस्ट्रक्चरिंग : हायर डिफेन्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेे की, भारत एकमेव देश असेल, जिथे काही अवधीसाठी संरक्षण मंत्रालयात तैनात होणारा एक सनदी अधिकारी(संरक्षण सचिव) संरक्षण व त्याच्या तयारीसाठी जबाबदार असतो. म्हणजे एक नोकरशहा युद्धाची योजना आखेल व तिन्ही सेनाप्रमुख ती लागू करतील.
> माजी नौदल प्रमुख एन.सी. विज यांनी इंग्रजी नियतकालिकात लिहिले की, विविध सेनांचे मत दाखवणारे मतभेद दूर करण्याच्या योग्य निर्णयापर्यंत पोहोचता येईल.

WHO कोण होईल पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
सरकारने अद्याप कोणतेही नाव निश्चित केले नाही. मात्र, २६ वे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल बिपिन रावत या पदाच्या स्पर्धेत अन्य दोन नावांपेक्षा पुढे असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची रँक तिन्ही लष्कराच्या प्रमुखांपेक्षा वर असेल की समान हे स्पष्ट नाही. यावरून सध्या वेगवेगळी चर्चा सुरू आहे. अशाच पद्धतीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस)चा कार्यकाळ किती असेल, हेही स्पष्ट नाही.

HOW कशी होईल निवड
याबाबत काहीही स्पष्टता नाही. मात्र, एक उच्चस्तरीय समिती सीडीएसच्या कार्यपद्धती व भूमिका नोव्हेंबरमध्ये निश्चित करेल. सीडीएसची रँक लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखावर असू शकते. भलेही त्यांच्याप्रमाणे फोरस्टार जनरल असो. भविष्यात यास फाइव्ह स्टार जनरलही केले जाऊ शकते.

WHERE आपल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे समपदस्थ कोण-कोण?

अमेरिका
येथे चेअरमन ऑफ स्टाफ कमिटी
(सीजेसीएससी) आपल्या चफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या समपदस्थ आहेत व अमेरिकी राष्ट्राध्यक्ष व संंरक्षणमंत्रीस राष्ट्रीय व अंतर्गत सुरक्षेवर सल्ला देते. जनरल जोसेफ डनफोर्ड सध्या सीजेसीएससी आहेत.

ब्रिटन
येथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच लष्कराचा प्रोफेशनल हेड असतो. ते संरक्षण मंत्री व पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार असतात. ते मंत्रालयाच्या स्थायी अवर सचिवासोबत नियोजन व योजनांवर काम करते.जनरल सर निक कार्टर विद्यमान सीडीएस आहेत.

चीन
येथे जाॅइंट स्टाफ डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल मिलिट्री कमिशनच पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ची सर्वोच्च संस्था आहे. ही सेंट्रल मिलिट्री कमिशनअंतर्गत काम करते. याचे मुख्यालय बीजिंगमध्ये आहे. सध्या चीफ ऑफ जॉइंट स्टाफ जनरल ली जोउचंेग प्रमुख आहेेत.

फ्रान्स
येथे चीफ ऑफ स्टाफ आर्मीज ही सर्व सेनांची प्रमुख असते. ते सर्व प्रकारच्या लष्करी कारवाईचे नेतृत्व करते. नियोजनापासून कारवाईपर्यंत सर्व ऑपरेशन्स यांचीच जबाबदारी आहे. सध्या जनरल फ्रान्कोसिस लॅकोन्त्रे या पदावर कार्यरत आहेत.

X