Home | Business | Business Special | The first construction company of the country, where all the women are from the architects, cabinet and painters

देशातील पहिली बांधकाम कंपनी, जिथे आर्किटेक्ट, गवंडी अन् पेंटरपर्यंत सर्व महिलाच

पूजा नायर पी | Update - May 13, 2019, 10:33 AM IST

बांधकाम क्षेत्रात महिलांचा अनाेखा पुढाकार, सहा महिन्यांपूर्वी स्वतंत्र कंपनी स्थापन

 • The first construction company of the country, where all the women are from the architects, cabinet and painters

  काेझीकाेड - बांधकामाच्या साइटवर आतापर्यंत तुम्ही कंत्राटदार, निरीक्षक, गवंडी, पेंटर हे सर्वकाही पुरुषच पाहिले असतील. मात्र, केरळच्या एका कंपनीने याला छेद देण्याचे काम केले आहे. येथील ३० महिलांनी पिंक लॅडर (गुलाबी शिडी) ब्रँडअंतर्गत दाेन बांधकाम कंपन्या स्थापन केल्या आहेत. पिंक लॅडर ज्या काही बांधकाम प्रकल्पावर काम करणार असेल तिथे एकही पुरुष दृष्टीस पडत नाही. इमारतीच्या डिझाइनपासून रंग देण्यापर्यंतची सर्व कामे महिलाच पार पाडतात. १ नाेव्हेंबर २०१८ राेजी सुरू झालेल्या या कंपनीने दाेन घरे बांधली असून आणखी दाेन घरांचे काम सुरू आहे. पिंक लॅडरच्या संयाेजक नीतू राजन म्हणाल्या,‘आम्ही परवडणाऱ्या घरांच्या उद्देशातून कंपनीची सुरुवात केली हाेती. त्याआधाी एका बांधकाम कंपनीत आर्किटेक्ट, पेंटिंग, फ्लाेरिंग तज्ज्ञांच्या सर्व टीमकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. यानंतर बेपाेरमध्ये पहिले घर बांधण्याचे आव्हान स्वीकारले. यानंतर आम्ही हळूहळू प्रकल्प वाढवले.


  असमान वेतनाविरुद्ध कंपनी
  पिंक लॅडर सरकारच्या सहकार्याने कुदुम्बश्री मिशनअंतर्गत (महिला सबलीकरण आंदाेलन) सुरू केले आहे. कुदुम्बश्री शाखेचे याेजना अधिकारी रामसे इस्माईल यांनी सांगितले की, प्रशिक्षणाच्या कमतरतेशिवाय असमान वेतन, कामाच्या अनिश्चित वेळा व लैंगिक छळासारख्या समस्याही सामान्य बाब आहे. या बाबी लक्षात घेऊन कुदुम्बश्रीच्या महिलांनी एक पुढाकार घेतला. त्यांनी कामाच्या वेळाही निश्चित केल्या.


  देशातील पहिला माॅल, जिथे १०० शाेरूमची मालकी महिलांकडे
  केरळमध्ये असा एक माॅल आहे, जिथे सर्व महत्त्वाच्या सदस्य महिला आहेत. काेझीकाेडमध्ये ३६,००० चाै.फूट क्षेत्रात ५ काेटी गुंतवणुकीतून माॅल तयार केला. त्यात १०० दुकाने आहेत. सर्व दुकानांची मालकी महिलांकडे आहे. येथे फूड काेर्ट, गेम झाेन, ब्यूटी पार्लर, बुटिक, ज्वेलरी शाॅप, महिला बँक, केरळ राज्य महिला मंडळाचे कार्यालय व कार शाॅप आहे.

Trending