आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The First Day night Is Test Match Played In 2015, India's First Match Wih The Pink Ball From Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिली डे-नाइट कसाेटी २०१५ झाला, भारताचा गुलाबी चेंडूवरचा पहिला सामना आजपासून

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला डे-नाईट कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड यांच्यात 2015 मध्ये झाला होता - Divya Marathi
पहिला डे-नाईट कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड यांच्यात 2015 मध्ये झाला होता

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसाेटी सामन्यांची मालिकेतील शेवटची मॅच ही डे-नाइट खेळवण्यात आली हाेती. गुलाबी चेंडूवरची ही पहिली कसाेटी हाेती. अॅडिलेडमध्ये २७ नाेव्हेंबरपासून १ डिसेंबरदरम्यान झालेल्या या कसाेटी सामन्यात यजमान आॅस्ट्रेलिया संघाने तीन गड्यांनी विजयाची नाेंद केली हाेती. न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावा आणि दुसऱ्या डावात २०८ धावा काढल्या हाेत्या. 

खेळाडूंनी सांगितला डे - नाईट कसोटी सामन्याचा अनुभव 


> डे-नाइट कसाेटी  वेगळ्या अनुभव देणारा सामना आहे.  चाहत्यांची पसंती दिली जाते. त्यामुळे खेळाडूंनाही खेळताना सामन्याचा आनंद लुटता येताे. - स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया
>  ही वेगळी, महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे. यामुळे क्रिकेटच्या विश्वातील चाहत्यांची कसाेटीबाबतची आवडही अधिक वाढली. भविष्यात  गुलाबी चेंडू  मागणी असेल. - मॅक्लुम, न्यूझीलंडचे कर्णधार> हा सामना  मनाेरंजक आणि राेमांचक ठरला हाेता. रात्रीच्या वेळी चेंडू  स्विंग हाेत हाेता.   रात्रीच्या प्रकाशात गाेलंदाजीची काही वेगळीच मजा येत हाेती.- हेझलवूड, सामनावीर
> यात फलंदाजी  कठीण हाेते. येथील थाेड्या गवतावरही चेंडू स्विंग हाेत हाेता. आता मला  यासाठी पिचवर फलंदाजी करण्याच्या टेक्निकवर काम करावे लागेल. - डेव्हिड वाॅर्नर, मालिकावीर