Achievement / क्यूआर काेडचा वापर केलेला पहिला हायटेक पीएचडी प्रबंध, औरंगाबादच्या जी. सूर्यकांत याची अपूर्व कामगिरी

वजन कमी करणे, संधिवात व आराेग्यासाठी फायदेशीर
 

विशेष प्रतिनिधी

Jun 16,2019 09:29:00 AM IST

औरंगाबाद - झटपट फाॅरमॅटमुळे क्रीडा विश्वात झपाट्याने प्रगती साधली गेली आहे. यातूनच क्रिकेटमध्ये टी-२० च्या आयपीएल आणि हाॅकीमध्ये ६-साइड स्पर्धेने लाेकप्रियता मिळवली. याच झटपटच्या फाॅरमॅटचा वापर करून औरंगाबादच्या जलतरणाचे मार्गदर्शक जी. सूर्यकांतने अवघ्या २० पानांत पीएचडी पूर्ण केली. अशा प्रकारे सर्वात कमी पानांमध्ये पीएचडी मिळवणारा ताे देशातील पहिलाच संशाेधक विद्यार्थी ठरला. क्यूआर काेडचा वापर केलेला देशातील हा पहिला पीएचडी प्रबंध ठरला आहे. अशा प्रकारे पीएचडीमध्ये या तंत्रप्रणालीचा देशपातळीवर वापर करणाराही ताे देशातील पहिला खेळाडू अभ्यासक ठरला आहे. त्याची झटपट फाॅरमॅटची ही पीएचडी चर्चेचा विषय आहे. यासाठीचा व्हायवा नुकताच झाला आहे. त्याने डाॅ. गाेडबाेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रबंध तयार केला.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील संशाेधक विद्यार्थी सूर्यकांतने यूजीसी निर्देशानुसार आणि व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्टाइल मॅन्युअलनुसार दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश करून प्रबंध तयार केला आहे. त्याने नुकतेच ‘डेव्हलपमेंट आॅफ कार्डिआे व्हस्क्युलर इन्डुरन्स अमंग द वाॅटर अॅराेबिक्स अँड फिटनेस अॅराेबिक्स बिटविन १४ टू १९ बाॅइज अँड गर्ल्स : अ कम्पॅरेटिव्ह स्टडीज’ या विषयावर संशाेधनात्मक अध्ययन केले. त्याने १४ ते १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी पाण्यात आणि पाण्याबाहेर केल्या जाणाऱ्या व्यायामाचा हृदयाभिसरण क्षमतेवर हाेणारा तुलनात्मक अभ्यास केला.


प्रथमच क्यूआरचा वापर
सूर्यकांतचा पीएचडीसाठीचा संशाेधनात्मक अभ्यास हा स्पाेर्ट‌्सच्या एका विषयावर आहे. त्यामुळे या क्रीडा प्रकारात अभ्यास करताना त्याने प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला. हे दाखवण्यासाठीच त्याने व्हिडिआेचा वापर केला. त्यासाठी त्याने क्यूआर काेडचा वापर करून हे सर्व व्हिडिआे दाखवले आहेत.


वजन कमी करणे, संधिवात व आराेग्यासाठी फायदेशीर
मुला-मुलींच्या पाण्यातील आणि पाण्याबाहेरच्या व्यायामामुळे शरीरास माेठा फायदा हाेताे. त्यामुळे आराेग्यसंपन्नतेसाठी वाॅटर अॅराेबिक्सचा वापर अधिक महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच याचा परिणाम वजन कमी करणे आणि संधिवातापासून दूर करण्यासाठी चांगल्या प्रकारे हाेत असल्याचेही निर्दशनातून समाेर आल्याची माहिती सूर्यकांतने दिली.

आराेग्यासाठी फायदेशीर
पाण्यातील व्यायामामुळे शरीराच्या सर्वच स्नायूंच्या हालचाली हाेेतात. त्यामुळे आजाराचे माेठे धाेके टाळता येतात.त्यामुळे हे आराेग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. पाण्याबाहेरच्या व्यायामात मर्यादा असतात.
डाॅ. आनंद देशमुख, औरंगाबाद

X
COMMENT