आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या हिंदू महिला खासदार गबार्ड निवडणूक लढवणार; राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुकांत 12 उमेदवार शर्यतीत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- भारतातील सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील वरिष्ठ सभागृहातील एकमेव हिंदू खासदार असलेल्या तुलसी गबार्ड यांनी यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपली दावेदारी जाहीर केली. डेमोक्रॅटिक पार्टीच्या १२ हून अधिक इच्छुकांशी गबार्ड यांची शर्यत आहे.
 
गबार्ड या हवाई प्रांतातील डेमोक्रॅटिक प्रतिनिधी आहेत. त्या चार वेळा निवडून आल्या आहेत. मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात यासंबंधीची औपचारिक घोषणा करणार असल्याचे त्यांनी 'सीएनएन'शी बोलताना सांगितले. भारतीय-अमेरिकन समुदायात गबार्ड अतिशय लोकप्रिय आहेत. वैयक्तिक जीवनाच्या सुरुवातीला त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. त्या निवडून आल्या तर अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्याचबरोबर तसे झाल्यास या पदावर पहिल्यांदाच ख्रिश्चनेतर व्यक्ती विराजमान होणार आहे. सध्याच्या स्थितीत मात्र अमेरिकेतील राजकीय पंडित मात्र गबार्ड यांच्या उमेदवारीकडे फारसे गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत. रॅनी ब्रॅटिस गबार्ड यांच्या मुख्य प्रचार मोहीमप्रमुख असतील. २०१६ मध्ये बर्नी सँडर्स यांच्या प्रचाराची जबाबदारी रॅनी यांच्याकडे होती.
 
हाऊस इंडिया कॉकसच्या सहप्रमुख 
गबार्ड हाऊस इंडिया कॉकसच्या सहप्रमुख राहिल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील प्रायमरी मतदान प्रक्रियेतील प्रबळ सर्कल म्हणून इंडिया कॉकसकडे पाहिले जाते. त्यामुळेच त्यात हवाई प्रांतातून सहजपणे चौथ्यांदा निवडून गेल्या. अमेरिकेसमोर अनेक समस्या अमेरिकेसमोर युद्ध व शांततेसंबंधीच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. डेमोक्रॅटिकची घोषणा झाल्यानंतर आम्ही विषयांना अधिक सविस्तरपणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू, असे गबार्ड यांनी सांगितले. 

 

निकी हॅले रिपब्लिकन कडून शक्य : 
अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी निकी हॅले यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला होता. पुढील वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा निवडणूक लढण्याची उत्सुकता दर्शवली नाही तर निकी हॅले या पदासाठी रिपब्लिकन पार्टीकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी चर्चा अमेरिकी माध्यमांतून सुरू झाली आहे. हॅले भारतीय-अमेरिकी वंशाच्या असून त्या साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आहेत. त्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या पहिल्या मंत्री म्हणून ओळखल्या जातात. २०२४ पर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत एकमत होईल, असेही जाणकारांना वाटते. 

 

प्रायमरीतील विजय महत्त्वाचा 
अमेरिकेत २०२० च्या सुरुवातीला प्रायमरीसाठी निवडणूक होणार आहे. त्यातून डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवाराची निवड केली जाईल. रिपब्लिकन उमेदवारासाठीदेखील त्याच वर्षी प्रायमरीची प्रक्रिया पार पडेल. यात विजय झाला तरच उमेदवारी मिळू शकते. प्रायमरीचा टप्पा ३ फेब्रुवारी २०२० पासून सुरू होणार आहे. तो २२ फेब्रुवारी २०२० पर्यंत चालणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...