Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | The first Indian to get 18 patents; Inspiration from Wangchuk; Now working with Mahindra

वांगचुक यांच्याकडून प्रेरणा घेत १८ पेटंट मिळवणारे पहिले भारतीय; आता महिंद्रासोबत करतायेत काम

दिव्य मराठी | Update - May 13, 2019, 09:47 AM IST

शिक्षणाचे सरलीकरण करून ४ हजारांपेक्षा जास्त प्रकल्प राबवले, आजवर ५२ हजार मुलांना प्रयोगांचे धडे दिले

 • The first Indian to get 18 patents; Inspiration from Wangchuk; Now working with Mahindra

  माझा जन्म नागपूरमध्ये झाला, पण यवतमाळमधील पाटणबोरी हे माझे मूळ गाव. वडील रवींद्र पाटणबोरीमध्ये एका सिमेंट फॅक्टरीत काम करत होते. आई शाळेत शिक्षिका होती. दोघांच्या पगारावर घरगाडा फक्त चालत होता. माझे नववीपर्यंतचे शिक्षण पाटणबोरी येथे झाले. पुढील शिक्षणासाठी मी यवतमाळमध्ये आलो, तेव्हा शाळेतही मन रमत नव्हते. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सोनम वांगचुकचा व्हायरस माझ्यात घुसलेला होता. मला काही तरी वेगळे करायचे होते. माझे विचार एेकून वडील रागावले, ‘आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर, चांगले मार्क मिळाले तर नोकरीही चांगली लागेल,’ असे म्हणाले.


  १२ वीनंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर माझ्या प्रतिभेला पंख फुटू लागले. २०१३ मध्ये दुसऱ्या वर्षाला असतानाच मी ‘अ व्हेरिएबल व्हाॅल्यूम पिस्टन सिलिंडर असेम्ब्ली’ नामक यंत्र बनवले. एखाद्या गाडीला हे यंत्र लावल्यास ती वेगवेगळ्या सीसीमध्ये बदलता येऊ शकते. या प्रयोगाबाबत मी महिंद्रा कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी कौतुक तर केले, पण हे व्यावसायिकदृष्ट्या न परवडणारे आहे, असे सांगितले.


  २०१३ मध्ये पुढील शिक्षणासाठी एनआयटी सिलचरला गेलो. मी जवळपासच्या गावकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या समजावून घेत होतो. त्या सोडवण्यासाठी काही प्रयोग करण्याचा विचार करू लागलो. मी चहाच्या पत्तीपासून बायोडिझेल बनवले, पण काॅलेज प्रशासनाला तेही मान्य झाले नाही. असे प्रयोग चालत नाहीत, म्हणून मी काॅलेजच सोडले. तसेही पुस्तके आणि पदवी घेण्यात मला रस नव्हता. या वर्षी मी नवा प्रयोग केला. डिझेल व पेट्रोल दोन्हीवर चालणार कार तयार केली. पेटंट घेऊन महिंद्रा कंपनीला सांगितले तेव्हा त्यांनी हिशेब करून म्हटले की, ही कार खूप महाग पडेल. बाजारात चालली नाही तर? २०१५ मध्ये मी इंजिनिअरिंग पूर्ण केले तेव्हा मी वाॅटर फिल्टर बनवले.


  आमच्या गावात नदी आहे, पण पाणीपुरवठा प्रणाली नसल्याने लोक भांड्याने पाणी भरत असत. मी २०० लिटरच्या एका ड्रममध्ये फिल्टर लावले. त्याला चाके असलेल्या गाडीवर बसवले. नदीचे पाणी घरी आणताना ड्रम फिरत होता, त्यामुळे घरी येईपर्यंत पाणी फिल्टर होत असे. ते एवढे शुद्ध होते की, पिताही येते. आता गावकरी खुश आहेत. महिंद्राची बॅटरीवाली कार एकदा चार्ज केल्यास १२० किमी चालते. मी हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करून बॅटरी संपल्यानंतरही दोन लिटर इंधनात १६० किमी चालणारी कार बनवली. म्हणजेच बॅटरी आणि दोन लिटर इंधनात २८० किलोमीटर. माझे यंत्र जोडल्यानंतर गाडी आता एकूण ३०० किलोमीटर चालते. महिंद्राला माझे पेटंट आवडले. आता मी त्यांच्यासोबत काम करत आहे.


  या दरम्यान १२ आविष्कारांचे पेटंट स्वत:च्या नावे करून मी २०१६ मध्ये सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी लडाखला गेलो. ते म्हणाले, आपल्या परिसरातील लोकांसाठी काम कर. त्यांना तुझी गरज आहे. त्यानंतर मी यवतमाळ जिल्ह्यातील शाळा-काॅलेजमधील मुलांशी माझे अनुभव शेअर करू लागलो. शिक्षण संस्थाही यामुळे प्रभावित झाल्या. त्यांच्या मदतीने आता मी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांची टीम बनवली आणि मुलांना शिकवायला सुरुवात केली. यवतमाळमध्येच सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांना मी शिकवले आहे. एप्रिल २०१९ पर्यंत मी ५२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. यासाठी मी कधीही शुल्क आकारले नाही. २०१८ मध्ये मी ‘ज्ञान फाउंडेशन’ची स्थापना केली. पाचवी ते १० व्या इयत्तेपर्यंत असा अभ्यासक्रम बनवला, ज्यात मुले अभ्यास नाही, तर विविध प्रयोगांमध्ये पारंगत होतील. शिक्षण सरल करण्यासाठी मी ४ हजारांहून अधिक प्रकल्प बनवले. गणिताचे ५०० माॅडेल बनवले, ज्यातून २५०० संकल्पना शिकता येतात. विज्ञान, भूगोल आणि इतिहासाचेही प्रकल्प बनवले. यात खेळता-खेळता मुली शिकतात आणि विसरतही नाहीत. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही स्वयंसेवकांना प्रशिक्षण देतो. हे स्वयंसेवक गावा-गावातील मुलांना शिकवतील. अनेक विद्यार्थ्यांना मी मोफत शिक्षण देतो. माझे हे काम देशभरात विस्तारले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.


  माझे काही प्रयोग- अॅडव्हान्स सोलर सिस्टिमवर काम करत आहे. प्रयोग यशस्वी झाला तर सामान्य पॅनलपेक्षा ३० टक्के जास्त क्षमतेने ऊर्जानिर्मिती होईल. आॅटोमॅटिक क्लिनिंग सिस्टिमने आउटपुट वाढेल. शिक्षण संस्थांमध्ये ४ हजार प्रयोग शाळेत घेतले जातात. ७० किमीपेक्षा जास्त अॅव्हरेज देणारी चारचाकी मी बनवली आहे. यावर महिंद्रासोबत काम करत आहे. १५० किमी प्रतिलिटरपेक्षा जास्त क्षमतेची दुचाकी बनवली. पोर्टेबल मोबाइल चार्जर, वाहन चालवतानाच तो हवेद्वारे चार्ज होतो. वाॅटर हार्वेस्टरमुळे कोरडे झालेले बोअर उन्हाळ्यातही पाणी देत आहेत. व्हेइकल ट्रेकिंग अँड अॅक्सिडेंटल सिस्टिमद्वारे चोरी झालेली गाडी पकडता येऊ शकते. तसेच अपघात झाल्यास नातेवाइकांना सूचना व लोकेशन मिळते.
  { शब्दांकन : अतुल पेठकर, नागपूर प्रतिनिधी)

Trending