Home | National | Other State | The first Indian valve plant in 77 years old women 

77 वर्षीय वृद्धेस बसवला पहिला भारतीय वॉल्व; केंद्र सरकारच्या परवानगीनंतर जयपूरला महिलेवर शस्त्रक्रिया 

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 11:16 AM IST

भारतीय वॉल्व परदेशीच्या तुलनेत १० लाखांनी स्वस्त 

  • The first Indian valve plant in 77 years old women 

    जयपुर- केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पहिला भारतीय हार्ट वॉल्व्ह जयपूरमध्ये बसवण्यात आला. गोव्याच्या रुग्ण तुलसी नार्वेकर (७७) यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

    हा भारतीय वॉल्व्ह बसवण्यासाठी इन्व्हेस्टिगेटर टीम व डीजीसीआयनेही सहमती दर्शवली होती. आता परदेशी वॉल्व्हऐवजी भारतीय वॉल्व्ह बसवण्यात येतील. भारतीय वॉल्व्ह परदेशी वॉल्व्हच्या तुलनेत १० लाखांनी स्वस्त आहेत. याचा फायदा हजारो हृदयरुग्ण भारतीयांना होऊ शकतो. म्हणजे २५ लाखांत बसवण्यात येणारे वॉल्व्ह आता १५ ते १७ लाख रुपयांत बसवले जाऊ शकतील. परदेशी वॉल्व्हची किंमत वाढत गेल्याने वॉल्व्हची गरज असणाऱ्या रुग्णांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहत होते. तसेच हे वॉल्व्ह सहजासहजी उपलब्ध होत नसत. परंतु भारतीय वॉल्व्ह आता सहजपणे उपलब्ध होऊ शकतील. शस्त्रक्रियेनंतर एखाद्या रुग्णास वॉल्व्हसंबंधात अडचणी अथवा काही त्रास जाणवू लागला तर क्लेम करणेही शक्य होणार आहे.

    आता सर्व रुग्णालये तो परदेशी वॉल्व्ह असल्याचे सांगून हात झटकून मोकळे होत असत. यासंदर्भात बोलताना डॉ. रवींद्र राव म्हणाले, पहिला भारतीय वॉल्व्ह बसवण्यात यशस्वी ठरणे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. या यशानंतर रुग्णांना स्वस्तात उपचार घेणे सहज शक्य झाले आहे.

Trending