आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून बाबाचे दर्शन : 2,234 भाविकांसह पहिला जथ्था रवाना, त्यात ३३३ महिलांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्प बालटालचे आहे. येथे निवारे उभारण्यात आली आहेत. पवित्र गुंफा येथून १४ किमी अंतरावर आहे. यामार्गे गेल्यानंतर दर्शन करून एका दिवसात परत येता येऊ शकते. - Divya Marathi
छायाचित्र जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्प बालटालचे आहे. येथे निवारे उभारण्यात आली आहेत. पवित्र गुंफा येथून १४ किमी अंतरावर आहे. यामार्गे गेल्यानंतर दर्शन करून एका दिवसात परत येता येऊ शकते.

श्रीनगर -अमरनाथ यात्रेला रविवारी सुरुवात झाली. भाविकांच्या पहिल्या जथ्थ्यात २ हजार २३४ यात्रेकरू असून ते बालटाल, पहलगाम बेस कॅम्पवरून सुरक्षा दलासोबत रवाना झाले. त्यात १ हजार ५१ भाविक बालटाल, तर १ हजार १८३ लोक पहलगाममार्गे दर्शनासाठी मार्गस्थ झाले. भाविकांत ३३३ महिला, ४५ साधू व १७ मुलेही आहेत. बालटालमार्गे जाणारे भाविक एक जुलै रोजी अर्थात सोमवारी बाबा अमरनाथाचे दर्शन घेतील. यात्रेतील वाहनांवर निगराणी ठेवण्यासाठी रेडिआे फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग लावला जाणार आहे. यात्रेकरूंची ओळख, त्यांचे लोकेशन जाणून घेण्यासाठी त्यांना स्लिप बारकोड दिला जाणार आहे. कॅम्पशिवाय पवित्र गुफेतही दर्शनापूर्वी अमरनाथ व्यवस्थापनाकडूनही कडक तपासणी होते. यात्रेतील रक्षाबंधन १५ ऑगस्ट रोजी साजरे होईल. 
 

मार्ग : पहलगाममधून पायी वा घोडेस्वारी
अमरनाथ गुंफा ३ हजार ८८८ मीटर उंचीवर आहे. सुरक्षेसाठी दोन्ही बेस कॅम्पपासून गुंफेपर्यंत सुमारे ६० हजार सुरक्षा दल तैनात केलेले आहेत. काश्मीरचा पहिला कॅम्प पहलगाम ९६ किमी अंतरावर आहे. येथपर्यंत लोक वाहनाने जातील. पहलगामपासून हे ठिकाण ४६ किमी अंतरावर आहे. तेथे घोडेस्वारी किंवा पायी जाता येईल. त्यात दोन दिवस लागतील.