Bollywood / 'बिग बॉस 13' चा पहिला प्रोमो रिलीज, स्टेशन मास्टरच्या रूपात दिसला सलमान खान 

यावेळी गोरेगावमध्ये बनेल शोचा सेट

Aug 26,2019 11:14:00 AM IST

'बिग बॉस-13' पहिला प्रोमो समोर आलेला आहे. कलर्स चॅनलने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर केले आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही शोचा होस्ट सलमान खान असणार आहे. प्रोमोमध्ये सलमान स्टेशन मास्टरच्या रूपात दिसत आहे. अंदाज लावला जात आहे की, यावेळी सलमान स्टेशन मास्टर बनूनच हाउस मेट्सचा प्रवास सांभाळणार आहे.

इंस्टाग्रामवर 'बिग बॉस' चा प्रोमो...

'सितारा स्पेशल' असेल 'बिग बॉस'ची गाडी...
प्रोमोमध्ये सलमान एका ट्रेनमध्ये बसून आगामी सीजनबद्दल सांगत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो, 'कृपया लक्ष द्या, यावेळी बिग बॉसची गाडी असेल सितारा स्पेशल, लवकर या नाहीतर पस्तावाल.' या प्रोमो व्हिडिओसाठी सलमान खानने प्रेक्षकांच्या मनात 'बिग बॉस 13' विषयी एक्साइटमेंट आणखीनच वाढवली आहे. प्रोमो पाहून हेदेखील म्हणता येऊ शकते की, शोमध्ये यावेळी काहीतरी धमाका होणार आहे.

यावेळी गोरेगावमध्ये बनेल शोचा सेट...
यावेळी 'बिग बॉस' च्या प्रवासात प्रेक्षकांना खूप ड्रमासोबत खूप सर्प्राइझेस मिळणार आहेत. सलमानचे हे 10 वे सीजन असेल. इंग्रजी वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, यावेळी 'बिग बॉस' मध्ये चंकी पांडे, सिद्धार्थ शुक्ला, देवोलीना भट्टाचार्जी, आदित्य नारायण, मुग्धा गोडसे आणि ऋचा भद्रा यांसारखे सेलिब्रिटीज दिसू शकतात. शोचा सेटदेखील यावेळी लोणावळ्याऐवजी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये तयार केला जात आहे.

X