• The first Ranji match will be played from today in baramati

रणजी ट्राॅफी / बारामतीच्या नव्या मैदानावर पहिला रणजी सामना आजपासून रंगणार

यजमान महाराष्ट्र-उत्तराखंड लढत; पहिल्याच रणजी सामन्याचे आयाेजन

दिव्य मराठी

Feb 12,2020 08:50:00 AM IST

बारामती - रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यात आज बुधवारपासून येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरुवात हाेत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने नव्यानेच या मैदानाला रणजी सामन्यांसाठीचा दर्जा बहाल करण्यात आला. त्यामुळे आता यंदाच्या सत्रातील पहिलाच रणजी सामना या मैदानावर आयाेजित करण्यात आला.


गत वर्षीच हे मैदान तयार करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या मैदानाचे उद‌्घाटन झाले. या मैदानावर आतापर्यंत प्रथम श्रेणीचे दाेन सामने खेळवण्यात आले. यामध्ये कुचबिहार करंडक (चार दिवसीय) आणि विजय मर्चंट चषक (तीन दिवसीय) स्पर्धेच्या प्रत्येकी एका सामन्याचा समावेश आहे. या मैदानावर पहिल्यांदा रणजी ट्राॅफीचा सामना हाेत आहे. रणजी ट्राॅफीसाठी आता याच्या रूपाने महाराष्ट्राला नवीन मैदान मिळाले आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमात बसणारे हे तिसरे मैदान ठरले.


विदर्भासमाेर हैदराबादचे आव्हान : दाेन वेळच्या चॅम्पियन विदर्भाच्या संघाला आज बुधवारपासून रणजी ट्राॅफीमध्ये यजमान हैदराबाद संघाच्या आव्हानाचा सामना करावा लागले. हे दाेन्ही संघ हैदराबाद येथील मैदानावर झंुजणार आहेत. तसेच ४१ वेळचा विजेता मंुबई संघ आपल्या घरच्या मैदानावर मध्य प्रदेश टीमविरुद्ध झंुज देणार आहे. मुंबईचा गत सामना अनिर्णित राहिला हाेता.


विजयाचे खाते उघडणार यजमान संघ

महाराष्ट्राचा संघ विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघ समाेरासमाेर असतील. आैरंगाबादचा युवा फलंदाज अंकित बावणे आता आपल्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्राला नव्या मैदानावर विजयाचे खाते उघडून देण्यासाठी उत्सुक आहे.

X
COMMENT