आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलास्कातील टोकसुक बे गावातून मोजणीला सुरुवात, 90 वर्षांच्या लिजी यांची पहिली नोंदणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत २०२०च्या जनगणनेची सुरुवात झाली आहे. सुरुवात अलास्का राज्यातील टोकसुक बे मध्ये अमेरिकेचे जनगणना ब्यूरोचे प्रमुख स्टीव्हन डिलिंगम यांनी केली. त्यांनी अमेरिकेच्या जनगणना ब्यूरोच्या अधिकाऱ्यांसह बर्फाने वेढलेल्या या गावात जाऊन स्थानिकांची भेट घेतली व त्यांना जनगणनेबाबत सांगितले. त्यानंतर गणना सुरू झाली. यात सर्वात पहिली नोंदणी ९० वर्षांच्या लिजी चिमियुगक नेंगुरयार यांची करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांची नोंदणी करण्यात आली. टोकसुक बे दुर्गम पश्चिम भागात आहे आणि राज्याचे मुख्य शहर एन्कोरेजपासून ८०० किमी लांब आहे. २०१७ च्या अहवालानुसार येथील लोकसंख्या सुमारे ६६१ आहे. तरए २०१० मध्ये ती ५९० होती. टोकसुक बे येथील रहिवासी स्वदेशी वंशाचे युपिक समुदायातील आहेत. या समुदायाचे मूळ अलास्का आणि दुर्गम पूर्व रशिया मानले जाते. ते विशेष यूपिक भाषेत बोलतात. गावातील मोजणी पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्यांनी स्थानिकांसोबत उत्सव केला.

अमेरिकेच्या जनगणना ब्यूरोचे प्रमुख स्टीव्हन डिलिंघम यांनी सांगितले की, ही फक्त गावातील लोकांची मोजणी नाही तर पूर्ण देशासाठी आकर्षण आहे. जनगणनेसाठी सुमारे ५ लाख नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. यासाठी १८ लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

२० अधिकृत भाषा, मात्र कोणातच दस्तऐवज नाही
अलास्का राज्यात सुमारे २० अधिकृत भाषा आहेत. मात्र, यातील एकातही जनगणनेसंदर्भातील सामग्री उपलब्ध नाही. अधिकाऱ्यांना जनगणनेच्या वेळी नेहमी आपल्या सोबत दुभाषक आणि ज्या स्थानिकांना येथील भाषा येतात त्यांना सोबत ठेवावे लागते.

उर्वरित अमेरिकेच्या तुलनेत दोन महिने आधी जनगणना
संपूर्ण अमेरिकेत जनगणना मार्चमध्ये सुरू होईल. मात्र, अलास्कामध्ये जानेवारीतच सुरू होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जानेवारीत बर्फ कडक असतो. त्यावरून डॉग स्लेज, स्नोमोबिल किंवा वाहनाने जाता येते. नंतर येथे जाणे अशक्य होईल.

बातम्या आणखी आहेत...