आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 जुलैला आहे विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना, पण पावसामुळे सामना रद्द झाला तर....?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- विश्वचषक 2019 चा पहिला सेमीफायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड उद्या (9 जुलै) होणार आहे. इंग्लंडच्या मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात हा सामना होईल. विशेष म्हणजे या विश्वचषकात न्यूझीलंड एकमेव असा संघ आहे, ज्यासोबत भारताचा सामना झाला नाही. याआधीही पावसामुळे या दोन संघांमधला सामना रद्द झाला होता. यातच विश्वचषकात असलेल्या पावसाचे संकट चाहत्यांच्या मनात घर करत आहे. उद्या फायनलसाठी होणाऱ्या लढतीत जर पावसाने खोडा घातला तर काय होईल असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.


चाहत्यांना पावसामुळे टेंशन घेण्याची गरज नाहीय, कारण उद्या जर सामना पावसामुळे रद्द झाला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार(10 जुलै) ला खेळवण्यात येईल. तसेच जर 10 तारखेलाही पाऊस झाला, तर मात्र आयसीसीच्या नियमाप्रमाणे दोन्ही टीमला  प्रत्येकी एक-एक गुण दिले जातील. या एक गुणासह टीम इंडियाच्या खात्यात एक वाढीव गुण मिळेल आणि भारत 16 गुणांवर पोहोचेल. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडे 11 गुण असल्याने त्यांचा 1 गुण वाढून एकूण गुणसंख्या 12 वर पोहोचेल. म्हणजेच जरी हा सामना रद्द झाला, तरी टीम इंडियाला याचा फायदा होईल.

 

 


भारत विरुद्ध न्यूझीलंडचा पहिल सेमीफायनल मँचेस्टरमध्ये 9 जुलैला खेळवण्यात येईल, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचा दुसरा सेमीफायनल 11 जुलैला होईल आणि दोन विजयी संघ विश्वविजेता होण्यासाठी 14 तारखेला लॉर्ड्सवर लढतील.