आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने पावसाच्या अडथळ्यानंतर पहिल्या टी-२० लढतीत बुधवारी अखेरच्या षटकांत रोमांचक झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ४ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने १७ षटकांत १५८ धावा काढल्या. त्यानंतर भारताला १७ षटकांत १७४ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, भारत १६९ धावा करू शकला.
नाणेफेक जिंकून भारतीयने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस आमंत्रित केले. मात्र सामन्याच्या १७ व्या षटकात पावसाने सुरुवात केली. काही काळ सामना थांबवावा लागला. त्यानंतर षटकांची संख्या १७ अशी कमी करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा काढल्या. मात्र, डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताला १७ षटकांत १७४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळाले.
प्रत्युत्तरात भारताचा सलामीवीर शिखर धवनची तडाखेबंद खेळी व्यर्थ ठरली. धवनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना ७६ धावा ठोकल्या. या खेळी त्याने १० चौकार व २ षटकार खेचले. धवनला बेहरेनड्रॉफने अॅरोन फिंचच्या हाती झेल बाद केले. रोहित शर्मा ७, के.एल. राहुल १३ आणि कर्णधार विराट कोहली अवघ्या ४ धावा करत तंबूत परतले. ऋषभ पंतने १५ चेंडूत २० धावा काढल्या. दिनेश कार्तिकने १३ चेंडूत ३० धावा केल्या. त्याला स्टोइनिसने बेहरेनड्रॉफच्या हाती झेलबाद केले. अॅडम झम्पाने २२ धावांत २ व मार्कस स्टोइनिसने २७ धावांत २ गडी टिपले.
मॅक्सवेल-स्टोइनिसची भागीदारी
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्याच्या ७५ धावांवर ३ विकेट गेल्या. त्यानंतर मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिसने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मॅक्सवेलने २४ चेंडूंत ४ षटकारांच्या मदतीने ४६ धावा काढल्या. स्टोइनिसने १९ चेंडूंत ३ चौकार व एक षटकारांसह ३३ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान १६.१ षटकांत पावसाचे आगमन झाले. त्यानंतर खेळ थांबला. आर्की शॉर्टला खलील अहमदने ७ धावांवर बाद केले. कर्णधार अॅरोन फिंचने २७ धावा आणि क्रिस लीनने २० चेंडूंत ३७ धावा केल्या. फिंच व लीन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली. मात्र, कुलदीपने फिंचला खलीलच्या हाती झेलबाद केले.
पुढील स्लाईडवर पहा सामन्याचे धावफलक...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.