आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशात विमान उड्डाण करणारी अनुप्रिया पहिली आदिवासी पायलट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकानगिरि/भुवनेश्वर : ओडिशातील नक्षल प्रभावित मलकानगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकडा देशातील पहिली आदिवासी महिला कमर्शियल पायलट ठरली. अनुप्रियाचे वडील मारिनियास लकडा ओडिशा पोलिस दलात हवालदार आहेत. आई जामज यास्मिन गृहिणी आहेत.

वडिलांनी सांगितले, पायलट होण्यासाठी तिने ७ वर्षापूर्वी इंजिनिअरिंग सोडले. भुवनेश्वर उड्डयन अकादमीत प्रवेश घेतला. या जिद्दीनेच ती एका खासगी विमान कंपनीत सह वैमानिक म्हणून काम करणार आहे. मलकानगिरी सारख्या मागास जिल्ह्यासाठी हे खूप मोठे यश आहे, असे तिच्या वडिलांनी सांगितले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन करताना नव्या पिढीसाठी ती प्रेरणादायी आहे, असे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...