आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम्याशी संबंधित पाच भ्रम व त्यामागील सत्य 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात दम्याच्या रुग्णांची संख्या 3 कोटींपेक्षा जास्त आहे. यावर नियंत्रण न मिळवल्यास 2010 पर्यंत हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण असेल. दम्याबाबत असलेल्या शंका आणि त्यामागील सत्यता जाणून घेणे गरजेचे आहे.


भ्रम : दमा हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. 
सत्य :
हा संसर्गजन्य आजार नाही. तुम्हाला कोणाकडून हा आजार होऊ शकत नाही किंवा तुमच्याद्वारे तो दुसऱ्या व्यक्तीत पसरू शकतो. मात्र, हा आनुवंशिक पद्धतीने एका पिढीद्वारे पुढच्या पिढीपर्यंत येऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 


भ्रम : दम्याच्या रुग्णांना गंभीर अवस्थेमध्येच इन्हेलरने औषध द्यावे,कारण यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकते. 
सत्य
: इन्हेलरने घेतले गेलेले औषध दमा नियंत्रित करण्यात सर्वात वेगवान, सुरक्षित व प्रभावी प्रकार आहे. यात औषधाचे प्रमाण गोळी व सिरपद्वारे दिलेल्या औषधापेक्षा ५०% कमी प्रमाणात असते. त्यामुळे या औषधाचे इतर परिणाम कमी असतात. 


भ्रम : दम्याचा परिणाम जास्त काळापर्यंत नाही राहत.यामुळे प्राणास कुठलाही धोका नसतो. 
सत्य :
दमा कधीही न ठिक होणारा आजार आहे. ज्याचा परिणाम कमी किंवा अधिक प्रमाणात होऊ शकतो.योग्य उपचाराने याला नियंत्रित केले जाऊ शकते. याचा उपयुक्त इलाज न केल्यास दम्याचा अॅटॅक येऊ शकतो.यामुळे जिवास धोका निर्माण होऊ शकतो.योग्य आहाराने देखील यास नियंत्रित केले जाऊ शकते. 


भ्रम : गर्भवती महिलांनी इन्हेलर तसेच इतर औषधी घेऊ नये ,यामुळे त्यांना नुकसान होऊ शकते. 
सत्य :
गर्भवती महिला इन्हेलर घेऊ शकतात. वैद्यकीय संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की गर्भवती महिलांनी इन्हेलरद्वारे दम्यास नियंत्रित केले तर स्वस्थ बाळास जन्म देऊ शकतात. 


भ्रम : दम्याचे लक्षण प्रत्येक रुग्णात सारखेच असतात. 
सत्य :
याचे लक्षण प्रत्येक रुग्णात वेगवेगळे असतात.काहि रुग्णामध्ये दमा झाल्यावर सर्दी-ताप ,शरीरदुखी, छातीमध्ये घरघर आवाज येणे,श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या होतात. तर काहींमध्ये फक्त खोकल्याची समस्या दिसून येते. तुम्ही स्वत: मध्ये या मधले कुठले लक्षण दिसतात ते पाहून वैद्यकीय उपचार घेऊ शकतात.