वैजापूर / गाेदाकाठनजीकच्या गावांत तीन दिवसांनंतर पूर ओसरला; आश्रित हजार लाेकांना पुन्हा घरी पाठवले

गोदावरीच्या पूरप्रभावित १८ गावांतील नुकसानीचे गुरुवारपासून पंचनामे

प्रशांत त्रिभुवन

Aug 08,2019 08:57:00 AM IST

वैजापूर - गोदावरी नदीपात्रालगतच्या १८ गावांत तीन दिवस पुराच्या तडाख्याने उडालेला हाहाकार आता पाण्याचा जोर ओसरल्यामुळे काही प्रमाणात विसावला असून पूर प्रभावित भागात परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यातून प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या एक हजार लोक त्यांच्या घरी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुका प्रशासनाने पूरप्रभावित भागात तैनात केलेले एस.डी.आर. एफचे बचाव पथकासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची तुकडी गोदावरी नदी क्षेत्रात कार्यरत ठेवली असून त्यांच्या मदतीला स्थानिक पोलिस दल सक्रिय ठेवला.


गोदावरी नदीत पहिल्यांदाच नांदूर- मधमेश्वर पिकअप वेअर बंधाऱ्यातून २ लाख ९० हजार क्युसेक वेगाने पुराच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तीन दिवसांत या पुराच्या पाण्याने नदीपात्रालगतच्या १८ गावांमधील गावकुसात थैमान पसरवले होते. शेतीवाडीसह घरादाराला पाण्याचा वेढा पडला होता. प्रशासनातील बचाव पथकाने पाण्याच्या प्रवाहात जीवित हानी होऊ नये या दृष्टिकोनातून एक हजार लोकांचे सुरक्षित स्थळी त्यांना हलवल्याने कुठेही जीवित हानीचा प्रकार घडला नाही.


पुरात दिसला माणुसकीचा झरा :

गोदावरी नदी पात्रात क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडल्याने नदी पात्र सोडून पाण्याने आजूबाजूच्या परिसराला विळखा टाकला होता

गोदावरीच्या पूरप्रभावित १८ गावांतील नुकसानीचे गुरुवारपासून पंचनामे

गोदावरी नदीतील पुराच्या पाण्याच्या तडाख्यात लाडगाव व नागमठाण महसूल मंडळातील १८ गावांतील खरीप पीक नुकसानीचे पंचनामे तीन दिवसांत तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी यंत्रणेला दिले आहेत. या नुकसानीत प्रामुख्याने कापूस, मका, बाजरी, तूर व अन्य पिकांचा समावेश असल्याने चार नायब तहसीलदार यांच्यासह मंडळधिकारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून संयुक्त पंचनामे करण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे.


नदी काठच्या शेतकऱ्यांना या पुरामूळे मोठा आर्थीक फटका बसला आहे.गोदावरी नदीकाठच्या १८ गावात या वर्षातील खरीप हंगामात एकूण १२ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागातील सूञांनी दिलीे. त्यात ७ हजार ६९ हेक्टर सर्वाधिक क्षेत्रावर कापूस तसेच ४ हजार ७३९ हेक्टरमधे मका आहे.

या गावाला पुराचा फटका
गोदावरी नदीकाठच्या सावखेडगंगा,बाभुळगाव गंगा, नांदूरढोक, पुरणगाव, लाखगंगा, नारायणपूर, बाबतारा, डोणगाव, नागमठाण, अव्वलगाव, डागपिंपळगाव,भालगाव, देवगावशनी, चेंडूफळ, हमरापूर, बाजाठाण या १८ गावातील ७ हजार हेक्टर वरील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान प्रत्यक्ष नुकसानीचा पंचनामा झाल्यावर वस्तुस्थिती समोर येईल.

X
COMMENT