आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोएडात उघडले फ्लाय रेस्तरां १६० फूट उंचीवर जेवण करतात ग्राहक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर-३८ मध्ये ‘फ्लाय डायव्हिंग’ रेस्तरां सुरू झाले आहे. येथे डायनिंग टेबल जमिनीपासून १६० फूट उंचीवर आहे. क्रेनच्या मदतीने हवेत तरंगणाऱ्या डायनिंग टेबलसह २४ आसने आहेत. या टेबलच्या मध्यभागी स्टाफ असतो. हा रेस्तरां सायंकाळी ६ ते रात्री दहापर्यंत सुरू असतो. एका ग्राहकांस जेवण्यासाठी ४० मिनिटांची वेळ दिलेली आहे. रेस्तरांचे संचालक निखिलकुमार म्हणाले, दोन वर्षांपूर्वी फ्लाय डायनिंगच्या स्टाफसाठी जर्मनीतील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. प्रत्येक सिटला बकलिंग लॉक सिस्टिम आहे.

क्रेनसह इतर सर्व उपकरणांची तपासणी केली जाते. जर्मनीत हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर  व त्याची  पडताळणी केल्यानंतरच येथे याचा वापर केला जात आहे. येथे गर्भवती व लहान मुलांना चार फुटापेक्षा जास्त वर बसण्यास मनाई आहे.