कोका कोला कंपनीच्या / कोका कोला कंपनीच्या माजी शास्त्रज्ञावर चीनसाठी अमेरिकेत हेरगिरी केल्याचा आरोप 

Feb 16,2019 10:00:00 AM IST

वॉशिंग्टन- कोका कोलाच्या एका माजी वरिष्ठ शास्त्रज्ञावर चीनच्या एका कंपनीसाठी १२ कोटी डॉलरचे (सुमारे ८५० कोटी रुपये) व्यापारी सिक्रेट चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे. न्याय विभागाच्या माहितीनुसार अमेरिकी नागरिक यू शियारोंग यांनी शीतपेयाच्या कंटेनरमध्ये वापरण्यात येणाऱ्या बीपीए-प्री केमिकल कोटिंगचे महागडे तंत्रज्ञान चोरले आहे. या तंत्रज्ञानावरच अॅटलांटामध्ये मुख्यालय असलेल्या कोका कोलासह अनेक कंपन्यांची मालकी आहे. कोका कोलाच्या प्रवक्त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, यू शियारोंग आधी कोका कोलामध्ये काम करत होते, याला त्यांनी दुजोरा दिला आहे.

आरोपपत्रानुसार यू शियारोंग यांनी चीनचे नागरिक लियू शियांगचेन आणि त्यांच्या एका नातेवाइकासोबत मिळून या केमिकल कोटिंगचा फॉर्म्युला चोरण्याचा कट रचला होता. ही कोटिंग बिस्फेनॉल-ए-केमिकलने युक्त आहे. हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे संशोधन अलीकडेच शास्त्रज्ञांनी केले होते. बीपीएचे इतर पर्याय दुर्लभ आहेत. मात्र, ते अत्यंत महागडेदेखील आहे.

लियुच्या कंपनीसाठी हे तंत्रज्ञान हवे होते. त्यासाठी लियुने यू शियारोंग यांना कंपनीमध्ये नोकरीची ऑफर दिली होती. मागील महिन्यात अमेरिकेमध्ये चीनची तंत्रज्ञान कंपनी हुवावे टेक्नॉलॉजी आणि कंपनीच्या सीएफओे मेंग वानझू यांच्यावर तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप केला होता तसेच २३ प्रकरणे नोंदवली होती. हे तंत्रज्ञान अमेरिकी कंपनी टी-मोबाइलची फोन-टेस्टिंग रोबोटशी संबंधित आहे.

X