आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Four day Shooting Footage Of Jarin Anshuman Starrer Film 'Hum Bhi Akele...' Disappeared, Makers Reached The Police

जरीन-अंशुमन स्टारर चित्रपट 'हम भी अकेले...' चे चार दिवसांचे शूटिंग फुटेज गायब, पोलिसांकडे पोहोचले मकेर्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जरीन खान आणि अंशुमन झा यांचा अपकमिंग चित्रपट 'हम भी अकेले तुम भी अकेले' चे 3-4 दिवसांचे शूटिंग फुटेज गायब झाले आहे. हे फुटेज एका हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलेले होते, जे हार्दिक जोशी नावाच्या डिजिटल इमेजिंग टेक्नीशियनकडे सोपवले गेले होते. त्याला या हार्ड डिस्कमधील फुटेज कन्व्हर्ट करण्याची जबाबदारी दिली गेली होती, मात्र एका आठवड्यानंतर जेव्हा मेकर्सने हार्दिक आणि त्याचा बॉस चित्रपटाचा डीओपी फारूख मिस्त्री यांना संपर्क केला तेव्हा दोघांकडून काहीही उत्तर आले नाही. 

 

सिंगापुर फिल्म मार्केटमधून घेतला गेला स्क्रीन प्ले... 
नाईलाजाने फिल्ममेकरला या हार्ड डिस्कच्या रिकव्हरीसाठी मुंबई पोलिसांची मदत घ्यावी लागली. बातमी आहे की, फिल्ममेकर हरीश व्यास आणि चित्रपटातील कलाकार अंशुमन झाने मुंबई येथील दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची माहिती पोलिसांना आणि सायबर सेलला दिली. त्यांनी हार्दिक जोशी आणि फारूख मिस्त्रीविरुद्ध कम्प्लेंट दाखल केली आहे. त्यांनी एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात ही हार्ड डिस्क पाडण्याअगोदर ती शोधण्याची विनंती केली आहे. चित्रपट 'हम भी अकेले तुम भी अकेले' चे स्क्रिप्ट एका सेलेक्टेड स्क्रीन प्ले सिंगापुर फिल्म मार्केटमधून मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये घेतली गेली होती. हा चित्रपट पुढच्यावर्षी व्हॅलेन्टाईन्स डेला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...