आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Fugitive Nityananda Established A New Country On The Island In Ecuador, Named Kailasa

बलात्कार प्रकरणातील फरारी नित्यानंदने त्रिनिदाद आणि टोबॅगो जवळच्या बेटावर नवीन देशाची केली स्थापना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बलात्काराचे आरोप असणारा स्वंयघोषित नित्यानंद स्वामी देशातून फरार झालेला आहे. त्याने आता त्रिनिदाद आणि टोबॅको जवळील एका बेटावर आपल्या स्वतःच्या देशाची निर्मिती केल्याच्या चर्चा सुरु आहेत. रिपोर्ट्सनुसार. त्याने कैलासा असे देशाचे नाव ठेवले आहे. मात्र या रिपोर्ट्सना अद्याप दुजोरा मिळाला नाही. 

नेपाळच्या मार्गाने झाला होता फरार

कर्नाटकात घडलेल्या बलात्काराच्या एका प्रकरणात नित्यानंदचा समावेश आहे. गुजरातमधील आश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण आणि मुलांना बंदी करून ठेवल्याच्या प्रकरणात पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान नित्यानंद नेपाळ मार्गे त्रिनिदाद येथे पळून गेल्याचे सांगितले जात आहे. 

नवीन देशाची वेबसाइट देखील केली तयार 


नित्यानंदने स्थापन केलेल्या नवीन देशाची वेबसाइट तयार केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या या वेबसाइटवर दावा करण्यात आला की, कैलासा सीमा नसणारा देश आहे. जगभरातून बेदखल  केलेल्या हिंदूंनी हा देश वसवला आहे. कर्नाटक पोलिसांच्या मते, नित्यानंद 2018च्या शेवटी जामीन मिळाल्याचा फायदा घेऊन देशातून फरार झाला होता. त्याच्या पासपोर्टची वैधता सप्टेंबर 2018 मध्ये संपली आहे.

बातम्या आणखी आहेत...