आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Fundamental Rights Of All, Not Just Muslims But The Poor, Tribals Who Cannot Provide Proof Of Citizenship, Will Be Violated Aruna Roy

मुस्लिमच नव्हे तर नागरिकत्वाचे पुरावे देऊ न शकणाऱ्या गरीब, अदिवासी अशा सर्वांच्याच मूलभूत अधिकारांचे हनन होणार आहे- अरुणा रॉय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राष्ट्रीय इतिहासात प्रकाशाचेच नव्हे तर काळोखाचेही कालखंड येतात'

पुणे- नागरिकत्व दुरुस्ती (सीएए), एनआरसी, एनपीआर हे कायदे एकाच कडीचा भाग असून या कायद्यांमुळे देशातील केवळ मुस्लिमच नव्हे तर नागरिकत्वाचे पुरावे देऊ न शकणाऱ्या गरीब, अदिवासी अशा सर्वांच्याच मूलभूत अधिकारांचे हनन होणार आहे. देशातील युवक भय, अन्याय, लोकशाही हननाचा निरंतर विरोध करत आहेत, त्यांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ माहिती अधिकार कायद्याच्या प्रणेत्या अरुणा रॉय यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांनी मासूम फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नाने साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०१९ वितरण सोहळ्याचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यानिमित्ताने त्या बोलत होत्या. यावेळी अरुणा रॉय आणि मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये साहित्य पुरस्कार विभागात दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके ( दोन लाख रुपये व स्मृतीचिन्ह), ललित ग्रंथ पुरस्कार कृष्णात खोत (रिंगण कादंबरी), अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार नीतीन रिंढे (लीळा पुस्तकाच्या) रां. शं. दातार नाट्य पुरस्कार दत्ता पाटील (हंडाभर चांदण्या) यांना देण्यात आला. प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर समाजकार्य पुरस्कार विभागात डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोझिकोडीच्या केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ए.पी. मुरलीधरन, विशेष कृतज्ञता पुरस्कार पुण्याचे राजेंद्र बहाळकर यांना देण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर मोहिनी केळकर स्मृती कार्यकर्ता पुरस्कार (संघर्ष) जामीलाबेगम पठाण इताकुला व कार्यकर्ता पुरस्कार (प्रबोधन) शहाजी गडहिरे यांना देण्यात आला. पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.


यावेळी महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनिल देशमुख म्हणाले, २६ वर्षापूर्वी अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशनचे कार्य सुरू केले. सामजिक कार्याला ध्येयवाद व योग्य व्यवस्थापनाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्वांची उत्तम साथ लाभली. महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव म्हणाले, उपेक्षित असलेल्यांची उपेक्षा दूर करण्यासाठी आरोग्य, गरिबी निर्मुलन, स्त्री अधिकार, वातावरणीय प्रदुषणावर याविषयावर कार्य केले. मुख्यत: उपेक्षितांच्या सबलीकरणाचा प्रयत्न केला.


राष्ट्रीय इतिहासात प्रकाशाचेच नव्हे तर काळोखाचेही कालखंड येतात परंतु सध्याचे काळोखाचे वातावरण आरोग्यासाठी चांगले नसले तरी ते कायम टिकणारे नाही. धर्म व अर्थसत्तेवर जेव्हा राजसत्तेचे वर्चस्व प्रस्थापित होते तेव्हा सामान्यांची परवड होते. आजचे पुरस्कारार्थी म्हणजे प्रकाशाचा दिवट्या असून याच दिवट्या प्रकाश आणतात. देश हिटलरशाहीच्या नव्हे तर गांधींच्या विचारांच्या उंबरठ्यावर आहे. - ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहा

बातम्या आणखी आहेत...