आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भारताचे माजी कप्तान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथील भागोजी कीर वैकुंठधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १९७१च्या वेस्ट इंडीज आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला मालिका जिंकून देणाऱ्या या क्रिकेट हीरोला साश्रुनयनांनी निरोप दिला. त्याप्रसंगी मुंबईतील क्रिकेटपटू, राजकीय नेते आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित वाडेकरांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये लपेटून अंत्यदर्शनासाठी 'स्पोर्ट््स फिल्ड' या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
'स्पोर्ट््स फिल्ड'पासून निघालेली अंत्ययात्रा, वाडेकरांची क्रिकेट कर्मभूमी असलेल्या शिवाजी पार्कभोवती आली. त्या वेळी शिवाजी पार्कातील हजारो छोट्या-मोठ्या क्रिकेटपटूंनी आपल्या या क्रिकेट हीरोला निरोप दिला. अजित वाडेकरांनी ज्या शिवाजी पार्क जिमखान्यातून आपली क्रिकेट कारकीर्द फुलवली त्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नजीकही अंत्ययात्रा दर्शनासाठी काही काळ थांबवण्यात आली होती. अंत्ययात्रा त्यानंतर वैकुंठधामकडे वळली. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, दिघे, नीलेश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, जतीन परांजपे आदींनी गुरूला आदरांजली वाहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.