Ganesh Festival / 2 सप्टेंबरला शिव-पार्वती योगामध्ये सुरु होईल गणेश उत्सव

मातीच्या श्रीगणेशाची करावी पूजा आणि श्रीगणेशाच्या 12 नाम मंत्राचा करावा जप

रिलिजन डेस्क

Sep 02,2019 12:15:00 AM IST

सोमवार, 2 सप्टेंबरला शिव-पार्वती योगामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात होईल. यावर्षी गणेश उत्सव काळात एक अमृतसिद्धी, दोन सर्वार्थसिद्धी आणि सहा रवी योग जुळून येतील. पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार श्रीगणेशाची स्थापना शिव-पार्वती योगामध्येच होईल. सोमवार महादेवाचा प्रिय दिवस आहे तसेच शुक्ल योग देव पार्वतीला प्रिय आहे. या दिवशी कन्या राशीमध्ये चंद्र राहील. हे सर्व शुभ योग सोमवारी राहतील.


मातीच्या श्रीगणेशाची करावी पूजा
2 आणि 3 सप्टेंबरला रवी योग, 4 सप्टेंबरला अमृतसिद्धी आणि रवी योग, 5 सप्टेंबरला सर्वर्थसिद्धी योग, 6 सप्टेंबरला रवी योग, 8 सप्टेंबरला सर्वार्थसिद्धी योग, 11 आणि 12 सप्टेंबरला रवी योग राहील. रवी योगामध्ये सुरु करण्यात अडथळ्याशिवाय पूर्ण होते. अमृतसिद्धी योगामध्ये करण्यात आलेले कार्य सिद्धी प्रदान करणारे आणि सर्वार्थसिद्धी योगामध्ये कार्याची सुरुवात यश प्राप्त करून देते. अशाप्रकारे गणेशोत्सव काळ सर्वप्रकारे शुभ राहील. पं. आनंदशंकर व्यास यांच्यानुसार श्रीगणेश मूर्ती आणण्यासाठी कोणतेही मुहूर्त नसते. गणेशाचा जन्म माध्यान्ह काळात मनाला जातो यामुळे मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना माध्यान्हात करावी.


श्रीगणेशाच्या 12 नावांचा करावा जप
ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गणेश उत्सव काळात सुख-समृद्धीचे दाता श्रीगणेश यांच्या पूजेमध्ये त्यांच्या 12 नावांच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जप कमीतकमी 108 वेळेस करावा.


ऊँ सुमुखाय नम:, ऊँ एकदंताय नम:, ऊँ कपिलाय नम:, ऊँ गजकर्णाय नम:, ऊँ लंबोदराय नम:, ऊँ विकटाय नम:, ऊँ विघ्ननाशाय नम:, ऊँ विनायकाय नम:, ऊँ धूम्रकेतवे नम:, ऊँ गणाध्यक्षाय नम:, ऊँ भालचंद्राय नम:, ऊँ गजाननाय नम:।

X
COMMENT