आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन हत्या, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात घडली धक्कादायक घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

मुंबई- मुंबईत सांताक्रुझ परिसरात एका तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हे दोघेही तरुणीचे जवळचे मित्र असल्याचे समजते.  या घटनेमुळे सांताक्रुझ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबतची सविस्तर घटना अशी की, मृत तरुणी ही सांताक्रुझमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहात होती. तिच्या घराशेजारी एका खोलीत तीन तरुण राहायचे. यापैकी दोघांनी पीडित तरुणीला त्यांच्या खोलीत बोलावले. तरुणी या तरुणांना ओळखत असल्याने ती त्यांच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यानंतर या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला, तिला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता उशीने तोंड दाबून त्यांनी तिची हत्या केली आणि तो पळून गेले.


दरम्यान, खोलीत राहणारा तिसरा तरुण रात्री घरी आला. दार उघडताच त्याला तरुणीचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ चाळीतील इतर रहिवासी आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही नराधमांना अटक केली. या दोघांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.