Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | The gathering of devotees started in pandharpur

पंढरीत भक्तांचा मेळा जमू लागला, रिंगणाने फेडले डोळ्याचे पारणे

प्रतिनिधी, | Update - Jul 11, 2019, 09:11 AM IST

बुधवार ठरला रिंगण दिवस...पालावर साजरी झाली कांदेनवमी...

 • The gathering of devotees started in pandharpur

  पंढरपूर - आषाढी एकादशीचा अनुप्यम्य सोहळा केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. राज्यभरातून येणारे पालखी सोहळे पंढरीनगरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वाखरी येथे बुधवारी विसावले. आषाढ शुद्ध दशमी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांचे पालखी सोहळे पंढरीनगरीत दाखल होणार आहेत. गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरही पंढरीत येणार आहेत.

  बुधवार ठरला रिंगण दिवस...
  बुधवारी बाजीराव विहिरीजवळ सुरुवातीला तुकोबा आणि नंतर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील रिंगण झाले. त्याच ठिकाणी संत सोपानदेवा काकांच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण झाले. उभे रिंगण सोहळ्यानंतर संत तुकाराम व संत सोपानदेवांची पालखी वाखरी तळाकडे मुक्ककामी गेली.

  पालावर साजरी झाली कांदेनवमी...
  संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह इतर संतांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी बुधवारी पालावर कांदेनवमी साजरी केली. एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. वारकरी या दरम्यान कांदा, लसूण खात नाही. त्यामुळे बुधवारी नवमी तिथी कांदेनवमी म्हणून साजरी केली. कांदाभजी, कांदा, लसूण वापरून भाजी अनेक पालांवर करण्यात आली.

Trending