आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Girl Said People To Vote For Life And Death On Instagram,and The Girl Actually Jumped From The Building.

मुलीने इंस्टाग्रामवर करून घेतले जीवन आणि मृत्यूचे वोटिंग, लोक म्हणाले - 'मारून जा...' तर खरच बिल्डिंगवरून मुलीने मारली उडी 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशिया : मलेशियामध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. 16 वर्षांच्या मुलीने इंस्टाग्रामवर एक पोलिंग केले. ज्यामध्ये तिने इंस्टाग्रामवर वोटिंगमध्ये लिहिले, 'मरु की नको.' या वोटिंगमध्ये 69 टक्के लोकांनी मृत्यूवर क्लिक केले, त्यानंतर त्या मुलीने बिल्डिंगच्या 13 व्या मजल्यावरून उडी मारली. The Guardian च्या माहितीनुसार, मलेशियाच्या पोलिसांनी मुलीचे नाव न सांगता माहिती दिली, ''मुलीने इंस्टाग्राम स्टोरीवर मॅसेज केला होता. ज्यामध्येब लिहिले होते, 'खूप गरजेचे आहे, कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करून मला मदत करावी. D/L (Death/Life).' ज्यावर 69 टक्के लोकांनी डेथवर क्लिक केले.''

 

मुलीच्या म्रुत्युबद्दल एका वकीलाने सांगितले, 'ज्या लोकांनी तिला मारण्यासाठी वोट दिले, ते आत्महत्या करण्यासाठी दोषी आहेत. 'वकील रामकरपाल सिंहने सांगितले, कदाचित ती मुलगी आजही जिवंत असती जर इंस्टाग्राम अकाउंटवर लोकांनी तिला मृत्यूसाठी प्रेरित केले नसते. लोकांनी तिला प्रोत्साहित केले आणि तिने सुसाइड केली. तपस सुरु आहे आणि पोलीस हे शोधात आहेत की, तिने कोणत्या परिस्थितीमध्ये आत्महत्या केली. मलेशियाई युवा आणि क्रीडा मंत्री सय्यद सादिक सईद अब्दुल रहमानने सांगितले, 'हे खूप दुर्दैवी आहे की, एक युवा जीवन अशा पद्धतीने संपले.' अब्दुल रहमानने देशात वाढत्या आत्महत्याबद्दल चर्चा करण्यासाठी एक बैठकदेखील बोलावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...