आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Girl Stole 250 Rupees From The Temple For 10 Kg Of Wheat, Now Cm Help That Family

दहा किलो गहूसाठी मुलीने मंदिरातून 250 रुपये चोरले होते, आता मुख्यमंत्र्यांनी केली 1 लाख रुपयांची मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक इमेज - Divya Marathi
प्रतीकात्मक इमेज

सागर (मध्यप्रदेश) - दहा किलो गहूसाठी मंदिरातील दानपेटीतून 250 रुपये चोरणाऱ्या 12 वर्षीय मुलीच्या परिवाराला मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, 'अनेकवेळा परिस्थितीमुळे लहान मुले चुकीच्या मार्गावर जातात.'

या मुलीने शनिवारी 10 किलो गव्हासाठी रहलीच्या टिकिटोरिया मंदिराच्या दानपेटीतून 250 रुपयांची चोरी केली होती. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. दरम्यान शनिवारी मुलीला जामीन न मिळाल्यामुळे तिला शहडोल येथील बालसुधार गृहात पाठवण्यात आले. दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी प्रिती मैथिल नायक यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी स्वतः त्या मुलील जामीन देण्याची व्यवस्था केली. तसेच मुलीच्या वडिलांना रेडक्रॉस सोसयटीतून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. जेणेकरून वडील मुलीला शहडोल येथून परत आणू शकतील. 
 

कुटुंबाला आर्थिक मदत, शिक्षण आणि राशन उपलब्ध करण्याचे दिले आदेश 
 

   

यामुळे मुलीने दानपेटीतून काढले होते पैसे
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, 'ते मजुरी करतात. पत्नीचे निधन झाले आहे. तीन मुले आहेत त्यात ही मुलगी सर्वांत मोठी आहे. तिने मागील आठवड्यात 10 किलो गहू दळण्यासाठी दिले होते. पण मुलगी जेव्हा गहू आणण्यासाठी गेली तेव्हा गिरणीवाल्याने गहू गायब झाल्याचे सांगत मुलीला परत पाठवले. यामुळे मुलगी घाबरली आणि तिने दानपेटीतून 250 रुपये चोरले.'