आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने गिळले मंगळसूत्र; एंडोस्कोपी व दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेने काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटण - गुजरातमधील हान्सापूर येथे दीड वर्षाच्या आस्था नावाच्या चिमुरडीने खेळता खेळता मंगळसूत्र गिळले. त्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले होते. आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे डॉ. हितेश पंचीवाला यांनी एंडोस्कोपी केली. दुर्बिणीच्या मदतीने शस्त्रक्रिया करून मंगळसूत्र बाहेर काढण्यात यश मिळवले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण येथील नव्या बसस्थानकाजवळ पाण्याच्या मोटार तयार करणाऱ्या कंपनीत काम करणारा बाहेसिद कुशवाह हा हान्सापूरमध्ये राहतो. तो मूळचा मध्य प्रदेशातील आहे. बाहेसिद याच्या दीड वर्षाच्या आस्था नावाच्या मुलीने घरात खेळता खेळता मंगळसूत्रच गिळले. तेव्हा पाटण सिटी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी एंडोस्कोपी व दुर्बिणीने शस्त्रक्रियेने काढले. 

बातम्या आणखी आहेत...