Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | The girls from Umarga school sent rakhi to the soldiers on the border

एक राखी सैनिकांसाठी: उमरगा शाळेतील मुलींनी सीमेवरील सैनिकांना पाठवल्या स्वनिर्मित राख्या

प्रतिनिधी | Update - Aug 26, 2018, 12:11 PM IST

सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास विद्यार्थ्यांना कळण्यासाठी राबवला 'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रम

  • The girls from Umarga school sent rakhi to the soldiers on the border
    उमरगा (उस्‍मानाबाद) - शहरातील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहशिक्षिका सरिता उपासे यांच्या मार्गदर्शानाखाली स्वत: राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना शुक्रवारी (दि.२४) पोस्टाने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले.

    देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षिका सरिता उपासे यांनी 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम राबवून चार दिवसांपासून विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत.


    सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल, असे मुख्याध्यापक धनराज तेलंग म्हणाले. सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना झाली, असे सरिता उपासे यांनी सांगितले. राख्या तयार करण्यासाठी कलाशिक्षक धनराज गाडेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शीला मुदगडे, ममता गायकवाड, रूपाली मुसळे, प्रभावती राठोड, शिल्पा चंदनशिवे, शकुंतला कलबुर्गी यांनी यासाठी सहकार्य केले.

Trending