आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथक सक्रिय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथक पुन्हा सक्रिय झाले असून, साेमवारी अनेक ठिकाणी पथकाने पाहणी केली. उघड्यावर शाैचास बसण्याचे प्रमाण बंद व्हावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही वाॅच राहणार अाहे. पथकाच्या कार्यपद्धतीवरही प्रशासन, पदाधिकाऱ्यांची नजर राहणार असून, प्रसंगी िचत्रीकरणही करणार अाहे. 

 

केंद्र व राज्य सरकारतर्फे हागणदारी मुक्त ग्रामसाठी माेहिम राबवण्यात येत अाहे. शौचालयासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. ग्रामस्थांनी शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून जनजागृती करण्यात येते. उघड्यावर शाैचास बसणे हे अाराेग्यासाठी कसे घातक अाहे, हेही सांगितले जाते. याच मोहिमेचा भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गावपातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार अाहे. शौचालय बांधकाम व वापरासाठी हे स्वच्छताग्रही ग्रामस्थांचे प्रबाेधन करणार अाहेत. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत अकाेला ३७६ क्रमांकावर हाेता. त्यामुळे स्वच्छाग्रहींच्या प्रबाेधन, गुडमॉर्निंग पथकाने पुन्हा सक्रिय हाेणे, अादींमुळे तरी िजल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त हाेते कि नाही, हे पाहणे अाैत्सुक्याचे राहणार अाहे. 


असे झाले पथक कार्यरत

प्रभारी सीईआे .विलास खिल्लारेंच्या आदेशानुसार बिडीअाे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) बाबारावजी पाचपटील यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जानेवारीला पथक अकाेट तालुक्यात सक्रिय झाले. पथकात समाजशास्त्रज्ञ शाहू भगत , आईसी सल्लागार राजेश डहाके , एमआयएस सल्लागार राहुल गोडले ,अभियांत्रिकी तज्ञ रोशन डामरे , संतोष चतरकर गट समन्वयक, पत्रकार कमलपुत्र सिरसाट सरपंच, ग्रामसेवक व ग्रा. प. पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
पथकाने केले समुपदेशन : गुड मॉर्निंग पथक अकोट तालुक्यातील पळसोद,टाकळी येथे गेले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पथकाकडून समज देऊन त्यांचे समुपदेशन केले.पळसोद येथे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी गोदरीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे प्रमाण कमी झाले. गावकरी शौचालयाचा वापर करतात. यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्र दिसल्यानंतर त्यांच्याकडून ग्रा.पं. दंड घेते. 

 

कचरा टाकणाऱ्यांना दिल्या सूचना

उघड्यावर खत,कचरा टाकणाऱ्यांना पथकाकडून ताकीद दिली. सांडपाण्यासाठी शोष खड्डे करण्याचे सुचित केले.गावातून गुड मॉर्निंग पथकाने फेरी काढून कोणी उघड्यावर शौचास बसू नये; अन्यथा गुड मॉर्निंग पथकाने पकडल्यास १२०० रुपयांपर्यंत दंड, ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो, असे सांिगतले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...