आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वभ्रमण करणारी सद्भावना यात्रा नांदेडात दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : श्री गुरू नानकदेवजी यांच्या ५५० व्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने सर्व विश्वाला शांतीसंदेश देण्यासाठी कॅनडा (नॉर्थ अमेरिका) येथून एकवीस देशांचे भ्रमण करून सद्भावना बस यात्रा शहरात पोहचली. कॅनडा शासनाच्या पर्यटन विभागाने या यात्रेला मंजुरी दिलेली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा यात्रेचे गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे आगमन झाले. यात्रेचे स्वागत गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी. पी. सिंघ, कनिष्ठ अधीक्षक (तृतीय ) रवींदर सिंग कपूर यांनी केले. गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी बस यात्रेला भेट देऊन यात्रेचे मुख्य आयोजक स. गुरुचरणसिंघ बनोत आणि त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा दिल्या. या यात्रेत श्रीमती सुरजित कौर, रणजीत सिंघ खालसा, शिंगारासिंघ , दलजित सिंघ बक्षसिंघ , हरमिंदर सिंघ, जसबीर सिंघ, रेशमसिंग, मोहिंदर कौर यांचा समावेश आहे. वरील यात्रेचे प्रस्थान दि. २१ मे रोजी नॉर्थ अमेरिका मध्ये झाले. येथून नंतर पाण्याच्या मार्गाने बस इंग्लंड कडे पाठवली गेली. दि. ३१ ऑगस्ट रोजी इंग्लंड मध्ये यात्रेला सुरुवात झाली आणि त्याठिकाणी गुरु नानकदेवजी यांच्या मानवता आणि विश्व शांतीचा संदेश प्रसारित करण्यात आला. पुढे ही यात्रा फ्रान्स, बेल्जीयम, जर्मनी, हॉलेन्ड, स्वित्झरलॅन्ड, इटाली, आस्ट्रिया, हंगेरी, टर्की, इराण आणि पाकिस्तानात पोहचली. येथे गुरु नानकदेवजी यांचे जन्मस्थान नानकांना साहेब येथे दर्शन करून यात्रा भारतात पोहचली. भारतातील सर्व मोठे गुरुद्वारे आणि मोठ्या शहरांना भेट देऊन यात्रा नांदेडला पोहचली. गुरुवारी पहाटे ही यात्रा मुंबईकडे प्रस्थान करेल.

'आमिर खान' यात्रेचे प्रायोजक

स. गुरुचरण सिंघ बनोत यांनी या प्रसंगी अावर्जूनपणे उल्लेख केला की कॅनडा येथील रहिवासी असलेले आमिर खान यांनी या बसयात्रेच्या आयोजनात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी वरील यात्रेसाठी आधुनिक प्रणालीची बस तयार करून दिली आहे. या यात्रेसाठी लागणाऱ्या इतर काही कार्यात त्यांनी दान स्वरूपात मदत देखील दिली आहे. गुरुचरणसिंघ यांनी त्यांचे विशेष आभार मानले.