• Home
  • National
  • The government announced the merger of banks, instead of 27 banks, there will be only 12 government banks

National / सरकारने बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली, 27 बँकांऐवजी आता फक्त 12 सरकारी बँक राहतील


लोन रिकव्हरी रेकॉर्ड स्तरावर, 250 कोटींपेक्षा जास्तीच्या प्रत्येक कर्जावर सरकारचे लक्ष

दिव्य मराठी वेब

Aug 30,2019 05:23:00 PM IST

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज(शुक्रवार) अर्थव्यवस्थाच्या पुढील दिशेबाबत सरकारकडून घेण्यात आलेल्या काही निर्णयांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, 5 ट्रिलियन डॉलरच्या इकोनॉमीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी सरकार अनेक मोठी पाऊले उचलत आहे. तसेच लोन रिकव्हरी रेकॉर्ड स्तरावर झाली आहे आणि 250 कोटी रुपयांपैक्षा जास्तीच्या प्रत्येक कर्जावर सरकार लक्ष ठेवेले.

बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा
सीतारमण यांनी घोषणा केली की, पीएनबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया या बँका विलीन होतील. या तिन्ही बँक मिळून मोठी सरकारी बँक तयार होईल, यांचा एकत्रित व्यापर 17.95 लाख कोटी रुपये असेल. कॅनरा आणि सिंडिकेट बँकदेखील विलीन होतील आणि चौथी मोठी बँक तयार होईल. यूनियन बँक आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होतील, ही पाचवी सर्वात मोठी बँक असेल, या बँकेचा व्यापार 14.59 लाख कोटी रुपये असेल. इंडियन बँक, इलाहाबाद बँकेत विलीन होउन 7वी मोठी बँक बनले,व्यवसाय 8.08 कोटी रुपये. आता 27 बँकांऐवजी फक्त 12 सरकारी बँक असतील. 8 सरकारी बँकांनी रेपो रेटशी निवडीत प्रोडक्ट लॉन्च केले.


त्या पुढे म्हणाल्या की, "भगोड़ा आर्थिक अपराध" कायद्या अंतर्गत अनेक पळपुट्यांची संपत्ती जप्त केली, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरुच आहे. नीरव मोदीसारख्या प्रकरणांना थांबवण्यासाठी स्विफ्ट बँकिंग सिस्टीम (सीबीएस) लागू केला आहे. आतापर्यंत 3.85 लाख शेल कंपनिया बंद करण्यात आली आहेत. तसेच बँकना रेपो रेटशी निवडीत प्रोडक्ट लॉन्च करण्यास सांगितले आहे. याच्या निकाल असा आला की, 8 सरकारी बँकानी याच्याशी निगडीत होम, व्हीकल, कॅश-क्रेडिट लोनसारखे प्रोडक्ट लॉन्च केले. एनपीएची रकम 8.65 लाख कोटी रुपयांतून कमी होऊन 7.90 लाख कोटी रुपये झाली आहे. कर्ज वसूलीने 14 सरकारी बँकांचे उत्पन्न वाढले आहे.

X