आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने रिझर्व्ह बँकेकडे अंतरिम लाभांशाची मागणी अद्याप केली नाही : शक्तिकांत दास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कंपनी करात कपात झाल्यानंतर महसूल तूट भरुन काढण्यासाठी सरकार  रिझर्व्ह बँकेकडे ३०,००० कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश मागू शकेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फेटाळून लावला. पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर दास म्हणाले, सरकारकडून अंतरिम लाभांश मागाणीसंदर्भात माझ्याकडे कुठलही माहिती नसून मला ही माहिती माध्यमांतून मिळाली आहे.  २०१७-१८ मध्ये सरकारने रिझर्व्ह बँकेकडून १०,००० कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश  प्राप्त केला होता. गेल्या महिन्यातील बिमल  जालान समितीने दिलेल्या अहवालानुसार वाढीव १,७६,०५१ कोटी रुपये हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. या रकमेतील १,२३,४१४ कोटी रुपये २०१८-१९ साठी वाढीव आहेत. ५२,६३७ कोटी रुपये आरबीआयसाठी सुधारित आर्थिक भांडवल आराखडया (ईसीएफ) च्या स्वरूपात अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

  • वित्तीय तुटीबाबत सरकारच्या वचनबद्धतेवर शंका नाही

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या वित्तीय तुटीवर शंका घेत नसल्याची माहिती दिली.  मार्च- एप्रिल  २०१९-२० च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट जीडीपीच्या ३.३ टक्के राहण्याची शक्यता आहे. परंतु अलीकडेच कॉर्पोरेट  करात कपात आणि जीएसटी संकलनात घट झाल्यामुळे हे लक्ष्य गाठण्याबाबतची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. तज्ञांच्या मते आर्थिक तूट ०.७ ते ०.८  टक्क्यांपर्यंत वाढू शकते. दास म्हणाले की, वित्तीय तूटीचे उद्दिष्ट कायम ठेवण्यासाठी सरकारकडे विविध महसुली स्रोत आहेत. सरकार इतर स्रोतांवरील कर वाढवून ही वित्तीय तूट भरू शकते.

  • एलव्हीबी, इंडियाबुल्सच्या विलीनीकरणाचा निर्णय नाही

शक्तिकांत दास म्हणाले, आता लक्ष्मी विलास बँक (एलव्हीबी) आणि  इंडियाबुल्स हाउसिंगच्या प्रस्तावित विलीनीकरणाचा अद्याप निर्णय झालेला नाही. लक्ष्मीनिवास बँकेस त्वरित सुधारणा रुपरेषेअंतर्गत आणण्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाबाबत रिझर्व्ह बँकेने स्वत:ची तयारी केली आहे. लक्ष्मी निवास बँकेविरुद्ध दंडात्मक कारवाईचा अर्थ रिझर्व्ह बँकेने विलीनीकरण टाळण्याचा निर्णय निश्चित केला आहे,असा होता का? या प्रश्नावर दास म्हणाले, एखाद्या प्रकरणातील निर्णय सार्वजनिक होत नाही तोपर्यंत आपण त्याबाबत मत बनवणे योग्य नाही.

  • देशातील बँकिंग प्रणाली बळकट, पूर्णपणे सुरक्षित

दास म्हणाले, देशातील बँकिंग प्रणाली मजबूत आणि स्थिर आहे. कुठल्याही  एका सहकारी बँकेतील घटनेमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्राबाबत निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. नागरी सहकारी बँकेत होणारे घोटाळे आणि  रिझर्व्ह बँकेने घातलेेले निर्बंधाबाबत दास बोलत होते. ते म्हणाले, बँक प्रणाली बळकट आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही दास यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...