Maharashtra Flood / 'सरकारला महाराष्ट्रातील संकटाशी काही देणं घेणं नाही, यांना फक्त मीच मुख्यमंत्री हेच सांगायचंय' - धनंजय मुंडे


पुन्हा महाजनादेश यात्रा काढण्याच्या भाजपाच्या निर्णयावर कडाडून टीका

तुषार खरात

Aug 13,2019 04:58:22 PM IST

मुंबई- "महाराष्ट्रातील संकटाशी या सरकारला काही देणं घेणं नाहीये. यांना फक्त मतं आणि मतं पाहिजे आणि पुन्हा मीच मुख्यमंत्री हेच सांगायचं आहे" अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने पुरग्रस्तांसाठी 50 लाखाचा धनादेश दिल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानभवनातील वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधला.

"इथं माणसं मरत आहेत. 14-15 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, लहान लेकराला दुध प्यायला नाही, अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाजनादेश यात्रा काढण्याऐवजी तिथे जावून बसण्याची आवश्यकता आहे. तिथे बसून प्रशासन हलवून आठ दिवसाच्या आत पुर्ववत स्थिती आणण्याची गरज आहे. मात्र जनतेला वार्‍यावर सोडून इकडे महाधनादेशाच्या महाजनादेश यात्रा काढत आहेत यांना लाज वाटायला हवी." असे धनंजय मुंडे म्हणाले.

X
COMMENT