आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपींना उतारा! सरकारी योजनांचा लाभ नाकारल्याने गाव दारूमुक्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव - गावात मद्यप्राशन करून आल्यास सरकारी योजनांचा लाभ व दाखले न देण्याचा निर्णय खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील ग्रामपंचायतने गेल्या नोव्हेंबरमध्ये घेतला होता. मद्यपींवर हा उतारा चांगलाच लागू पडला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने गावातील मद्यपींचे व्यसन सुटले असून मद्य विक्रेत्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.

 

गावात मद्यपींनी उच्छाद मांडला होता. यामुळे सरपंच माधुरी गायगोळ यांनी मद्यपींना शासकीय योजनांचा लाभ तसेच दाखले न देण्याची संकल्पना मांडली. ती ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांनी उचलून धरली. २१ तरुणांचे पथक तयार केले. हे तरुण दारू पिऊन घरी आलेल्यांना प्रेमाने तर प्रसंगी तंबी देऊन 'पुन्हा दारू पिऊन आल्यास गाव सोडून जावे लागेल, असे बजावतात. गावात लग्न आदी समारंभ असल्यास वऱ्हाडींना दारू पिऊन न येण्याच्या सूचना दिल्या जातात. यामुळे लग्न समारंभातील भांडणतंटेसुद्धा थांबले आहे. तसेच गावातील अंतर्गत तंटे-वादही संपुष्टात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...