आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या मुलीचा नियोजित वेळेपूर्वी जन्म झाला होता, त्यामुळे ती मरणारच होती, असे म्हणत मदतीचे पैसे घटवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘तुमच्या मुलीचा नियोजित वेळेपूर्वी जन्म झाला होता. त्यामुळे ती अशीही मरणारच होती,’ असा असंवेदनशील तर्क लावत मुंबईतील ईएसआयसी रुग्णालयात लागलेल्या आगीत मरण पावलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम प्रशासनाकडून कमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

अंधेरी भागातील मरोळ येथील कर्मचारी रुग्णालयात मागच्या आठवड्यात भीषण आग लागून ११ जणांचे प्राण गेले होते. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी ललिता लोगावी यांनी या रुग्णालयात मुलगा आणि मुलगी अशा जुळ्यास जन्म दिला होता. आगीत मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख आणि गंभीर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, लोगावी यांना रुग्णालय प्रशासनाकडून २-२ लाख रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले. त्यापैकी एक मृत मुलीच्या नावाने भरपाई म्हणून आणि दुसरा जखमी मुलाच्या उपचारासाठी देण्यात आला आहे.

 

प्रशासनाच्या दावा आहे की, लोगावी यांच्या जुळ्या मुलांचा जन्म नियोजित वेळेपूर्वी (प्रीमॅच्युअर) झाला होता. म्हणून त्यांच्यावर कामगार रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु, मुलीचा मृत्यू हा त्या दिवशी लागलेल्या आगीत नव्हे, तर नैसर्गिकरीत्या झाला. तर, लोगावी यांनी सांगितले की, घटनेवेळी मुलीला कामगार रुग्णालयातून होली स्पिरीट रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

 

मदतीची संपूर्ण रक्कम देणार : किरीट सोमय्या
या प्रकरणी मृताच्या नातेवाइकांना संपूर्ण रक्कम देण्यात येईल. त्यासाठी ईएसआयसीने संमती दर्शवली असल्याची माहिती कामगार मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष आणि खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...