आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचा पैसा वापरून 'यात्रा' काढणारे सरकार बेरोजगारी वाढवणारे : पटोले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगाव ( जि. यवतमाळ) : महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी, बेरोजगारी याबाबत विविध प्रकारचे आश्वासन दिले होते, त्यातील कुठल्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. हे सरकार लबाडांचे आहे. वरून यात्रा काढून जनतेचा पैसा खर्च करत आहे. हे सरकार बेरोजगारी दूर करणारे नाही, तर बेरोजगारी वाढवणारे असल्याचे वक्तव्य महापर्दाफाश यात्रेचे प्रमुख नाना पटोले यांनी केले. सरकारविरोधात काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेच्या दुसरा टप्प्याला मंगळवार, ३ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघात सभा पार पडली. 

या वेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये माणिकराव ठाकरे, नानाजी पटोले, माजी खासदार राजीव सातव, आमदार यशोमती ठाकूर, हरिभाऊ राठोड, डॉ. वजाहत मिर्झा, विजयराव खडसे, डॉ. महंमद नदीम, वसंतराव पुरके यांच्यासह इतरही नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी सरकारच्या सर्व योजना फसव्या असल्याची टीका केली. 

सरकारने एकही याेजना पूर्ण केली नसल्याचा पुरकेंचा आरोप
सरकारने विविध योजना आणल्याचा दावा केला. मात्र, एकही योजना पूर्ण केली नाही म्हणून ही महापर्दाफाश यात्रा भाजपला काढावी लागत आहे. बाभूळगाव तालुक्यातील एक प्रकल्प २००६ मध्ये आघाडी सरकारने मंजूर केला होता, परंतु तो प्रकल्प या सरकारने रद्द केला. तरीही आपल्या मतदारसंघातील मंत्री अशोक उईके यांना माहीत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल, असे मत माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी व्यक्त केले. मंत्रिमहोदय हे वीस वर्षांत जे केले नाही, ते मी पाच वर्षांत केले असे सांगत फिरत आहेत, असेही पुरके यांनी म्हणाले.या वेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व विदर्भातील नेत्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...