politics / सुमार कामगिरी असलेल्या ग्रामसेवकांची घेतली परीक्षा; दाेघांची प्रकृती बिघडली 

जिल्हा परिषदेतून सीईओ म्हणाले काम करायची इच्छा नसल्यास व्हीआरएस घ्या; कामात सुधारणा हवी 

दिव्य मराठी

Aug 19,2019 12:06:00 PM IST

अकाेला : सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्ह्यातील निवडक ग्रामसेवकांचे जिजल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष िशबिर आयाेजित करण्यात आले होते. या िशबिराला गैरहजर असलेल्या दाेन ग्रामसेवकांचे वेतन राेखण्याचा अादेश प्रशासनाने जारी केला. याच ठिकाणी ग्रामसेवकांची लेखी परीक्षाही घेण्यात आली. परीक्षेदरम्यान दाेन ग्रामसेवकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सर्वाेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्यावर डाॅक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच उपचार करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामसेवकांना आठवडाभर केलेल्या कामाचा अनुपालन अहवाल सादर करावा लागणार आहे. िशबिरादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुमार कामगिरी असलेल्या ग्रामसेवकांना खडे सुनावत काम करण्याची इच्छा नसल्यास स्वेच्छा निवृत्ती स्वीकारावा, असा सल्ला दिला.

काही दिवसांपूर्वी प्रशासनाने काही निवडक ग्रामसेवकांचे आढावा शिबिर आयाेजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी झालेल्या शिबिराला एम. एम. रेखाते, एस. आर. ठाेंबरे, आर. आर. गंडाळे, जी.सएस. डाबेराव, एस.व्ही. पाटील, व्ही.एम. वायाळ, बि.पी. साेळंके, पी.आर. गुजर, डी. पी. बिडकर, यु.डी. तेलगाेटे, एस.बी. काकड, एम.एम. भांबुरकर, महादेव भारसाकळे, एस.व्ही. वाडेकर, एम.बी. बुंदे, एस.एम. हाताेलकर, ए.आर. खाेडके, एस.जे. शेळके, के. एस. वानखडे, बी. एल. गरकल, व्ही.व्ही. चव्हाण, एस. डब्ल्यु. डाेंगरे, एस.एस. अंभाेरे, एस.आर. अवधुत, डी.एस. महल्ले, एस. यु. अनभाेरे, व्ही. आर. अंधारे उपस्थित हाेते. यावेळी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप भंडारे, राेहिदास भाेयर, स्वीय सहाय्यक राजेंद्र भटकर आदी उपस्थित हाेते.

गैरहजर राहिलेल्या दाेन ग्रामसेवकांचे वेतन राेखले
सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्ह्यातील निवडक ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष िशबिरावेळी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेवेळी प्रकृती बिघडलेल्या दोघा ग्रामसेवकांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना जि.प. सीईओ व डीसीईओ.
अनधिकृतपणे गैरहजर असल्याने नाेकरीची अावश्यकता नाही

शिबिराला हजर असलेले ग्रामसेवक जी. आर. टिकार (तेल्हारा), शितल माेरे (बाळापूर) यांचे पुढील आदेशापर्यंत वेतन राेखण्याचा आदेश सीईओ आयुष प्रसाद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केला. पूर्वनियाेजित शिबिराला अनधिकृतपणे गैरहजर असल्याने आपणास नाेकरीची आवश्यकता दिसून येत नसून, आपली विनावेतन असाधारण रजा मंजूर का करु नये, आपणावर प्रशाकीय कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये, असा सवाल आदेशात करण्यात आले आहेत. तीन दिवसाच्या आत अभिप्राय सादर करण्यासही या ग्रामसेवकांना सांगण्यात आले आहे.

परीक्षेदरम्यान यांची बिघडली प्रकृती
विशेष शिबिराअंतर्गत परीक्षेदरम्यान कांचन वानखडे (बाळापूर ) आणि सुपाजी वानखडे (बाळापूर) यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बाेलावण्यात आली. त्यांनी सभागृहात डाॅक्टरांची तपासणी केली. त्यानंतर दाेघांना सर्वाेपचार रुग्णालयात करण्यात आले. काही वेळाने जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष व डेप्युटी सीईओ भंडारे यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांची विचारपूस केली आणि त्यांना फळेही दिली.

X