Home | National | Gujarat | The Gujarat Forest Department searched a tiger in two days with the help of 200 employees

गुजरातच्या वन विभागाने 200 कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन दिवसांत केला एका वाघाचा शोध 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 14, 2019, 11:09 AM IST

डिसेंबर - २०१७ पासून गुजरातमध्ये होता वाघ, मध्य प्रदेशात उज्जैनच्या रातापानी येथून सुरू केला प्रवास 

 • The Gujarat Forest Department searched a tiger in two days with the help of 200 employees

  बडोदा- गुजरातच्या वन विभागाने दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी राज्यात वाघ असल्याची खात्री पटवली. तत्पूर्वी २०० वन कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून वाघांची संभाव्य उपस्थिती असणाऱ्या वनक्षेत्रातील ५४ गावांचे सर्वेक्षणही केले. सोमवारी सायंकाळी संतरामपूरमध्ये गावात वाघाची हालचाल नाइट व्हिजन कॅमेऱ्यात कैद झाली. त्याची छायाचित्रे विभागाने जारी केली आहेत. आता गुजरातमध्ये मार्जार कुळातील सिंह, वाघ व बिबट्या अशा तिन्ही प्रजाती उपलब्ध असणारे पहिले राज्य बनले आहे. वन विभागाचे वन संरक्षक आर. एम. परमार यांनी सांगितले, महिसागर जिल्ह्यात वाघ आहे, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. सरकारच्या आदेशावरून आम्ही वाघाचे संरक्षण करण्यासाठी योग्य ते निर्णय घेणार आहोत. शुक्रवारी संतरामपूर येथील शिक्षक महेश यांनी येथे वाघ पाहिला. त्यानंतर वन विभागाने वाघाच्या निवासाचे आवश्यक ते सर्व पुरावे गोळा केले.

  उज्जैनहून ५०६ किमीचा प्रवास करून आला वाघ हा वाघ मध्य प्रदेशातील उज्जैन येथून निघाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रातापानी ते संतरामपूर, गुजरातपर्यंत सुमारे ५०६ किमीचा प्रवास करण्यास या वाघाला एक वर्ष एक महिना लागला. याचा प्रवास नर्मदा काठावरून झाला.

  उज्जैनहून ५०६ किमीचा प्रवास करून आला वाघ
  हा वाघ मध्य प्रदेशातील उज्जैन येथून निघाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रातापानी ते संतरामपूर, गुजरातपर्यंत सुमारे ५०६ किमीचा प्रवास करण्यास या वाघाला एक वर्ष एक महिना लागला. याचा प्रवास नर्मदा काठावरून झाला.

  नाइट व्हिजन कॅमेऱ्यात कैद
  वाघाचे पहिले छायाचित्र प्राथमिक शाळेतील शिक्षक महेशभाई मेहरा यांनी काढले. त्यांनी वाघ पाहिल्याचा दावा केला व काढलेल्या फोटोच्या आधारे वन विभागाने त्याची संभाव्य हालचाल असलेल्या भागात नाइट व्हिजन कॅमेरे लावले. सोमवारी यात वाघाची हालचाल कैद झाली.

  राज्यात वाघ असल्याचे प्रथम दावा करणारे महेश म्हणाले, हे माझ्यासाठी आनंददायी
  वाघाचे सर्वप्रथम छायाचित्र टिपलेल्या महेश मेहरा यांनी राज्यात वाघ असल्याच्या वार्तेवरून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, माझ्या एका फोटोवरून इतकी हालचाल झाली याचा आनंद वाटतो. मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे.

Trending