आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Haunting Story Of Mysterious Creatures Thought To Be Out Of This World Discovered

जुन्या इमारतीच्या तळघरात सापडले विचित्र जीवांचे अवशेष; कुणी म्हणतं सैतान, तर काहींच्या मते Aliens! आजही गूढ कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ही छायाचित्रे इंग्लंडच्या एका पडीक अनाथाश्रमाची आहेत. काही वर्षांपूर्वीच या इमारतीचे खोदकाम झाले, तेव्हा तळघरात विचित्र जीवांचे सांगाडे सापडले. हे जीव इतके विचित्र होते, की पाहून सगळेच घाबरले. अनेकांनी त्यांना भूत आणि पिशाचांचे अवशेष असे म्हटले. अशाच प्रकारचे एकूण 5000 सांगाडे येथे पाहायला मिळतील. काही दशकांपूर्वी येथे एक अनाथाश्रम होते. यानंतर नवीन बिल्डिंगच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले. त्याचवेळी या रहस्यमयी बेसमेंटचा शोध लागला होता. यातील अनेक जीवांची आकृती मानवी असली तरीही त्यांच्या डोक्यावर शिंगा आणि पाठीवर पंख होते. त्यापैकी काहींना तर भिंतीवर खिळ्यांनी ठोकून कैद करण्यात आले होते. हे जीव खरेखुरे होते का आणि त्यांचे रहस्य काय याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.


थॉमस नावाच्या व्यक्तीचा होता तो खजिना
- या विचित्र जीवांच्या खजिन्याचा मालक 2006 मध्ये थॉमस मॅरिलिन होता असे सांगितले जाते. तो एक क्रिप्टो नॅचरलिस्ट होता. तो एक असा पुरातत्ववेदता होता जो फक्त अस्तित्वात नसलेल्या आणि निसर्गविरोधी जीवांचा शोध घेऊन ते संग्रहित करायचा. त्याने आयुष्यभर अशाच गोष्टी जगभरातून कलेक्ट केल्या आणि ते सर्व अवशेष याच तळघरात आणून लपविल्या होत्या. 
- ज्या जीवांचे अवशेष या तळघरात सापडले त्यांना विज्ञान मान्य करत नाही. तरीही लोकांना ते सैतान आणि दुसऱ्या जगातील जीव वाटतात. थॉमसच्या बाबतीत अनेक दंतकथा आहेत. त्यापैकी एक म्हणजे, त्याचा जन्म 1762 मध्ये झाला होता. तो इतकी वर्षे कसा जगला यावर सुद्धा काही दंतकथा आहेत. तो काळी जादू करायचा त्यामुळेच तो इतकी वर्षे जिवंत होता. तर काही लोकांच्या मते, त्याचे वय 80 वर्षे होते. तरीही तो 40 वर्षांचा दिसत होता.

 

या अटींवर अनाथाश्रमाला दान केली जागा...

- ज्या ठिकाणी अनाथाश्रम चालत होते ते आधी थॉमस मॅरिलिन नावाच्या व्यक्तीचे घर होते. त्याने 1942 मध्ये ही जागा अनाथाश्रमाला दान केली होती. त्यावेळी थॉमस एक अट ठेवली होती. त्यानुसार, ही इमारत कधीच पाडली जाणार नाही. तसेच इमारतीच्या बेसमेंटचे दार कधीही उघडले जाणार नाही. 
- 2006 मध्ये त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्या इमारतीला पाडून त्या ठिकाणी दुसरी इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. यासाठी खोदकाम करण्यात आले. तेव्हाच बेसमेंट उघडले आणि 5000 सांगाडे सापडले. या सर्वच जीवांचा आकार, चेहरा आणि देह असे आहेत जे फक्त भयकथा आणि नॉव्हेल्समध्ये ऐकण्यात आले आहे.


थॉमसचे वडीलही होते पुरातत्ववेदता
मॅरिलिनने आपल्या वडिलांसोबत जगभ्रमंती केली होती. त्याचे वडील सुद्धा विचित्र दिसणाऱ्या प्राण्यांचे अध्ययन करत होते. जग ज्या गोष्टींना मानत नाही त्याचा ते अभ्यास करत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर एकटा पडलेल्या थॉमसने नंतर स्वतः हे काम सुरू केले. आयुष्यभर त्याने हे सांगाडे जगभरातून गोळा केले. लोक या सांगाड्यांना सैतान, भूत आणि पिशाचांचे अवशेष असे म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...