आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेड काॅन्स्टेबलने पाेलिस ठाण्यात घेतली १० हजार रुपयांची लाच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - वाळूचे पकडलेले टिप्पर कोर्टामार्फत सोडण्याकरिता रिपोर्ट देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ती पोलिस ठाण्यातच घेताना पाचोड येथील पोलिस कॉन्स्टेबलला जालना एसीबीच्या पथकाने पकडले. शेख गुलफाम शेख हुसेन (पाचोड पोलिस ठाणे, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. 


तक्रारदाराच्या मालकीच्या टिप्परमधून शहागड ते औरंगाबाद अशी वाळू वाहतूक केली जात हाेती. औरंगाबादकडे जात असताना पाचोड समोरील मुरमा फाटा येथे पाचोड ठाण्याच्या पोलिसांनी वाळूचे टिप्पर अडवून ते पाचोड येथे नेले. या प्रकरणात  चालक, मालकावर गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यात चालक व मालकाला अटक होऊन त्यांची १९ जुलै रोजी जामिनावर सुटका झाली. जामीन मिळाल्यानंतर पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख याच्याकडे वाळूचे टिप्पर सोडवण्यासाठी व तपासात मदत करण्याची विनंती टिप्पर मालकाने केली असता शेख याने तुम्ही कोर्टात अर्ज करा व मला १० हजार रुपये द्या. त्याशिवाय मी  गाडी साेडण्याचा रिपोर्ट देणार नाही व तपासात मदत करणार नाही, असे सांगितले. तक्रारदाराने त्यास माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितल्यानंतर शेख याने  तुला जर गाडी सोडायची असेल व तपासात मदत करायची असेल तर मला १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा मी मदत करणार नाही, असे बजावले. त्यामुळे टिप्पर मालकाने लाच देण्याची तयारी दाखवत जालना  एसीबीकडे तक्रार केली.   एसीबीने पडताळणी करून सापळा लावला. २३ जुलै रोजी पाचाेड ठाण्यात  लाच घेताना शेख यास रंगेहाथ पकडले. 
 

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलिस उपअधीक्षक रवींद्र डी. निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, सचिन राऊत, खंदारे यांनी पार पाडली आहे.

बातम्या आणखी आहेत...