आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेजावर मठाचे मठाधिपती विश्वेश तीर्थ स्वामी यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी मठातच घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पेजावर मठाचे मठाधिपती विश्वेश तीर्थ स्वामी यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी मठात घेतला अखेरचा श्वास
  • विश्‍व तीर्थ स्वामीजींना तब्येत बिघडल्यामुळे २० डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
  • लाइफ सपोर्ट सिस्टीमवर असूनही त्यांनी हॉस्पिटलमधून आश्रमात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती
  • भाजप नेत्या उमा भारती देखील आठवड्यापासून येथे आहेत

बंगळुरू - पेजावर मठाचे मठाधिपती विश्वेश तीर्थ स्वामी यांचे रविवारी सकाळी उडुपी येथील श्रीकृष्ण मठात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. स्वामींनी सकाळी साडे नऊ वाजता अखेरचा श्वास घेतल्याचे उडुपीचे आमदार रघुपती भट यांनी सांगितले. त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी महात्मा गांधी मैदानात ठेवण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येदियुरप्पा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लाइफ सपोर्ट सिस्टीमवर असूनही, आश्रमात जाण्याची इच्छा होती


20 डिसेंबर रोजी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
येथे लाईफ सपोर्ट सिस्टीममध्ये ठेवल्यानंतरही, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. यानंतर त्यांनी रुग्णालयातून मठात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कस्तुरबा रुग्णालयाने शनिवारी हेल्थ बुलेटिनमध्ये सांगितले की श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांची प्रकृती अतिशय गंभीर असून प्रकृती खालावत आहे. ते बेशुद्ध आहेत. परंतु यानंतरही मठाचे अधिकारी त्यांना आश्रमात घेऊन गेले. 

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे गुरू होते विश्वेश तीर्थ स्वामी 

विश्वेश स्वामीजी मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेता उमा भारती यांचे गुरु होते. उमा भारती आठवड्यापासून उडुपीत आहेत. त्यांनी 1992 मध्ये स्वामीजींकडून संन्यासाची दीक्षा घेतली होती. नरेंद्र मोदी देखील 2014 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर स्वामींना भेटण्यासाठी गेले होते. पेजावर मठ उडुपीच्या 'अष्ट'मठांपैकी एक आहे. 
 

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून वाहिली श्रद्धांजली