आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Head Of The Coffee Company First Married A 20 Year Old Girl At The Age Of 70,

70 वर्षीय कॉफी कंपनीच्या प्रमुखाने 20 वर्षीय युवतीशी केला पहिला विवाह, तब्बल 4.7 कोटी रुपये मिळाला हुंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - एका कॉफी कंपनीच्या प्रमुखाने रविवारी वयाच्या 70 व्या वर्षी 20 वर्षीय युवतीसोबत लग्न केले. विशेष म्हणजे हे त्या मालकाचे पहिलेच लग्न होते. वधु आणि वर यांच्या वयात 50 वर्षांचे अंतर असल्यामुळे या विवाहाची थायलंड, चीन, मलेशिया आणि तैवानच्या माध्यमांमध्ये चर्चा आहे. या शाही विवाहाचे फोटो नवरदेव खाओ सोंग यांचा जवळचा मित्र चेथा सोंगथावेपोल यांनी फेसबुकवर पोस्ट केले होते. हे फोटो आता व्हायरल होत आहेत. स्थानिक मीडियानुसार, लग्नात 4.7 कोटी रुपयांचा हुंडा देण्यात आला आहे. याप्रसंगी नवरदेवाने सांगितले की, ते लग्नासाठी अगोदरपासून तयार होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी विवाहाचा दिवस आल्यानंतर मी माझ्या नवरीसोबत लग्न करण्यासाठी परत येईल. दरम्यान या लग्नात वधूच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही.