आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगत्वावर मात करत मतदानाचा उत्स्फूर्त हक्क बजावणारे नायक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे | पर्वती मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर सुरेखा खुडे या दिव्यांग महिलेने मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडले. या महिलेला दंडापासून दोन्ही हात नाहीत. त्यामुळे उजव्या हाताला असलेल्या एकमेव बोटाला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी शाई लावली आणि सुरेखा यांनी आनंदाने लाेकशाहीची ही खूण सर्वांना दाखवली. “प्रत्येक मत हे अमूल्य असतं, त्यामुळे अधिकाधिक मतदान करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
 
> ठाण्यातील दिव्यांग जाधव जयराम वाघेला यांनी सकाळीच मतदान करून लाेकशाहीवरील अापला विश्वास दाखवून देत इतरांनाही संदेश दिला.
 
> जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे एका दिव्यांग मतदाराला त्यांच्या कुटुंबीयांनी अतिशय काळजीपूर्वक केंद्रावर आणले.